Maharashtra Assembly Election 2024 : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलने करणारे मनोज जरांगे यांना राजकारणात हस्तक्षेप करायचे नसेल त्यामुळे त्यांनी माघार घेतली असावी. हा निर्णय योग्य आहे, पण त्याचा भाजपला फायदा होईल का? याचे विश्लेषण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच होईल, असे मत माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपनेते रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडी ही महाविनाश आघाडी असून, आगामी काळात दररोज महाविकास आघाडीच्या विरोधात आरोपपत्र सादर केले जाणार असल्याचे दानवे (Raosaheb Danve) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत जनतेने भाजप-शिवसेनेला कौल दिला होता. पण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेचा कौल नाकारून कॉंग्रेससोबत अभद्र युती केली. त्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राची वाट लागली.
भ्रष्टाचार, विकासाला विरोध, शेतकऱ्यांची उपेक्षा, दुर्बल घटकांकडे उद्धव ठाकरे यांनी दुर्लक्ष केले. महाराष्ट्राचा विकास रोखला. मेट्रोच्या कामाला स्थगिती दिली. उद्योगांचे मार्ग रोखले. कोविड काळात घोटाळे केले, असा आरोप दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. त्यामुळे भाजप दररोज महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आरोपपत्र सादर करणार आहे, असे दानवे यांनी नमूद केले.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वातावरणात फरक आहे. त्यामुळे जनतेचा कौल भाजपला मिळेल, असा दावा त्यांनी केला. (Manoj Jarange Patil) मनोज जरांगे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याच्या प्रश्नावर त्यांना राजकारणात हस्तक्षेप करायचा नसेल. त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे, पण फायदा भाजपला होईल का? हे निवडणूक निकालानंतरच कळेल, असे दानवे म्हणाले.
राज्यात ज्या ठिकाणी बंडखोरी झाली होती, त्याठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी एकत्र बसून, अनेकांची समजूत काढली आहे. सदा सरवणकर यांच्या बाबतीतही योग्य तो निर्णय नेते मंडळी घेतील, असेही दानवे यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.