Raosaheb Danve Net Worth : कोट्यधीश दानवेंकडे ना दुचाकी, ना चारचाकी पण आहे 18 लाखांचं पशूधन

Raosaheb Danve Property : रावसाहेब दानवे यांनी काल जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जाबरोबर मालमत्तेचे शपथपत्र निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहे.
Raosaheb Danve
Raosaheb Danve Sarkarnama

MP Raosaheb Danve Property News : जालना लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे (Jalna loksabha election 2024) उमेदवार खासदार रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा लोकसभेला शड्डू ठोकला आहे. महाविकास आघाडीचे डॉ. कल्याण काळे Kalyan Kale हे मैदानात आहेत. काळे यांनीही शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

रावसाहेब दानवे यांनी काल जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जाबरोबर मालमत्तेचे शपथपत्र निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहे. यामध्ये उमेदवार तसेच त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची माहिती नमूद करण्यात आली आहे.

जालना मतदारसंघातून सहाव्यांदा निवडणुकीसाठी उभे असणारे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्याकडे एकूण 42 कोटी मालमत्ता 59 लक्ष 82 हजार रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता Net Worth आहे. दानवे यांच्या उत्पनात गेल्या पाच वर्षांत 26 लाख 52 हजार रूपयांची वाढ झाली असून त्यांच्या पत्नी निर्मला दानवेंच्या Nirmala danve Net Worth उत्पनात 6 लाख, 24 हजार रूपयांची वाढ झाली आहे.

रावसाहेब दानवे Raosaheb Danve यांच्याकडे 24 कोटी 37 लाख रूपयांची स्थावर मालमत्ता असून 4 कोटी 51 लाख रूपयांची जंगम मालमत्ता आहे, तर दानवेंच्या पत्नी निर्मला दानवे यांच्याकडे 12 कोटी 83 लाख 38 हजार रूपयांची स्थावर आणि 88 लाख 44 हजार रूपयांची जंगम मालमत्ता आहे. रावसाहेबांच्या नावे 4 कोटी 2 लाखांचे कर्ज तर त्याच्या पत्नीच्या नावे 3 कोटी 46 लाख 33 हजार रूपयांचे कर्ज आहे

वारसाहक्काने मिळालेली मालमत्ता

दानवे यांना वारसाहक्काने 93 लाख रूपयांची मालमत्ता मिळालेली असून निर्मला दानवेंना 3 कोटी 88 लाख, 36 हजार रूपयांची मालमत्ता वारसाहक्काने मिळालेली आहे. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या शपथपत्रात ही माहिती देण्यात असून शेती, खासदार पदाचे वेतन, भाडे हे त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत अशी माहिती यामध्ये नमून करण्यात आली आहे.

सोने- चांदी

रावसाहेब दानवे यांच्या नावे 5 तोळे सोने आणि 4 किलो 700 ग्रॅम चांदी आहे. निर्मला दानवे यांच्याजवळ 45 तोळे सोने आणि 2 किलो 700 ग्रॅम चांदी आहे. तर 18 लाख 24 हजार रूपयांचे पशूधन दानवेंजवळ आहे.

दानवे कुटुंबाकडील स्थावर मालमत्ता

दानवे आणि त्यांच्या पत्नींच्या नावे भोकरदन,राजूर,नळणी,जालना,जळगाव सपकाळ,विझोरा,धावडा,पद्मावती,तपोवन, जवखेडा बु.आणि खु. या ठिकाणी सुमारे 70 एकर शेतजमीन आहे. निर्मला दानवेंच्या नावे जवखेडा,कोठा दाभाडी आणि सिल्लोड येथे 25 एकर शेतजमीन आहे. यासह भोकरदन,राजूर,जाफराबाद,जालना व जवखेडा येथे घर आणि माहोरा जळगाव सपकाळ, उरसोनी ता.भिवंडी जि.ठाणे ,भोकरदन आणि जालन्यात व्यवसायिक मालमत्ता आहेत.

दानवें यांच्या नावे नाही एकही कार

शपथपत्रानुसार दानवेंच्या आणि त्यांच्या पत्नींच्या नावावर एकही कार, गाडी नाही.

गुंतवणूक

जिजामाता गृहनिर्माण संस्था, मुंबई यात 2 लाख 50 हजार रूपयांचे शेअर आहेत. यासह रामेश्वर साखर कारखाना,सिध्देश्वर साखर कारखाना आणि स्थानिक सहकारी संस्थेत दानवे यांचे शेअर आहेत. रावसाहेब दानवेंच्या पोस्टात 6 कोटी 44 लाख विविध बँक आणि सहकारी पतसंस्थेत 2 कोटी 46 लाख 36 हजार रूपयांच्या ठेवी आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com