Raosaheb Danve Statement: दानवे म्हणाले, पुढेही मीच रेल्वेमंत्री होणार..

Raosaheb Danve Statement Railway Minister: लातूर जिल्ह्यातील रेल्वेचे प्रश्न बऱ्यापैकी सुटले आहेत, आणखीनही मागण्या आहेत. पण त्या पुढच्यावेळी पुर्ण करू.
Raosaheb Danve News
Raosaheb Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada News: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे भाषण म्हणजे उपस्थितांसाठी पर्वणी असते. खुमासदार आणि अस्सल ग्रामीण ढंगातील त्यांची बोली ऐकण्यासाठी कार्यकर्तेही कायम उत्सूक असतात. (Latur) लातूरमध्ये त्यांनी एक भविष्यवाणी केली, त्यामुळे दानवेही आता ज्योतीष्यकार झाले की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

Raosaheb Danve News
Pankaja Munde Speech: व्यापारी देशाच्या पाठीचा कणा, त्यांना संरक्षण मिळाले पाहिजे..

लातूर जिल्ह्यातील रेल्वे प्रश्ना संदर्भात आपल्या भाषणात बोलतांना त्यांनी तुमच्या अर्ध्या मागण्या पुर्ण झाल्या आहेत, राहिलेल्या २०२४ मध्ये पुर्ण करणार. कारण पुन्हा मीच रेल्वे मंत्री होणार आहे, असा दावा दानवे (Raosaheb Danve) यांनी केला. त्याला उपस्थितांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद देखील दिला, विरोधकांच्या मात्र दानवेंच्या दाव्यानंतर भुवया उंचावल्या आहेत.

अंबुलगा येथील साखर कारखान्यातील विविध प्रकल्पाचे उद्घाटन काल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते पार पडले. (Marathwada) यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात रेल्वे खात्याशी संबंधित विषयासह इथेनाॅल निर्मिती, शेती फायद्यात कशी आणता येईल यावर सविस्तर मार्गदर्शन केले. (Bjp) पण लातूरमध्ये येवून आपल्या आवडत्या खात्याबद्दल ते भरभरून बोलले.

लातूर येथील मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीत लवकरच वंदे भारत ट्रेनच्या कोचची निर्मिती सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगतिले. दीडेशे वंदे भारत रेल्वेचे कोच या फॅक्टरीत तयार केले जाणार आहेत. रेल्वे विकासासह इतर बाबतीत लातूर जिल्हा भाग्यशाली आहे. एक विकसित जिल्हा म्हणून लातूरचे नाव देशपातळीवर आहे.

त्या तुलनेत आमचा जालना मागासलेला, पण आता तिथे देखील विकासकामे वेगाने होत आहे. लातूर जिल्ह्यातील रेल्वेचे प्रश्न बऱ्यापैकी सुटले आहेत, आणखीनही मागण्या आहेत. पण त्या पुढच्यावेळी पुर्ण करू. कारण २०२४ ला देशात पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचेच सरकार आणि त्यात मीच रेल्वे मंत्री होणार, असा दावा दानवे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com