Raosaheb Danve News : रावसाहेब दानवे आता उघडपणे मैदानात, सत्तार-खोतकरांना अंगावर घेतले

Raosaheb Danve openly in the field against Abdul Sattar-Arjun Khotkar : राज्यात शिवसेना-भाजप युती असताना खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्याविरोधात लोकसभा लढवण्याची घोषणा केली होती. तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या अब्दुल सत्तार यांची साथ खोतकरांना लाभली.
Abdul Sattar, Arjun Khotkar, Raosaheb danve
Abdul Sattar, Arjun Khotkar, Raosaheb danve Srakarnama
Published on
Updated on

Jalna District Shivsena-BJP Politics : माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. काँग्रेसच्या डाॅ. कल्याण काळे यांनी त्यांचा लाखाच्यावर मतांनी पराभव केला. या पराभवाला महायुतीतील शिवसेना मित्र पक्षाचे जालना जिल्ह्यातील दोन नेते मंत्री अब्दुल सत्तार आणि माजी मंत्री अर्जून खोतकर यांचाही हातभार लागला. पण आपल्या पराभावेच क्रेडीट या जोडीला देऊन त्यांचे महत्व न वाढवण्याची चाल रावसाहेब दानवे यांनी खेळली.

यासाठी स्वतःच्या मुलाच्या मतदारसंघात मी नऊशे मतांनी पिछाडीवर होतो, मग त्याने माझ्या विरोधात काम केले? असे म्हणायचे का? असा सवाल दानवे (Raosaheb Danve) करतात. मी महायुतीचा धर्म पाळणार असे सांगणारे रावसाहेब दानवे आता उघडपणे मंत्री अब्दुल सत्तार आणि माजीमंत्री अर्जून खोतकर यांच्याविरोधात मैदानात उतरल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, ते दानवे या दोन्ही नेत्यांबद्दल आक्रमक होतांना दिसत आहेत.

जालना जिल्ह्याच्या राजकारणात दानवे- खोतकर यांच्यामध्ये विळ्या-भोपळ्याचे वैर आहे. निवडणूक मोठी असो की छोटी? या दोघांभोवतीच फिरते हे आतापर्यंत दिसून आले आहे. जिल्ह्यातील सत्ता केंद्रांचे समान वाटप करत राजकारण करणाऱ्या या दोन नेत्यांमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी ठिणगी पडली होती. अगदी राज्यात शिवसेना-भाजप युती असताना खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्याविरोधात लोकसभा लढवण्याची घोषणा केली होती.

Abdul Sattar, Arjun Khotkar, Raosaheb danve
Raosaheb Danve: मी कच्च्या गोट्या खेळलेला माणूस नाही, चांगल्या चांगल्यांचे मी मुडदे पाडलेत! दानवेंनी खोतकरांना सुनावले खडेबोल

तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांची साथ खोतकरांना लाभली. पण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांमध्ये समेट घडवून आणली, विधानसभेला पुर्ण ताकदीने मदतीचा शब्द घेत खोतकरांनी आपली तलवार म्यान केली होती. लोकसभेत दानवे सलग पाचव्यांदा निवडून आले, पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अर्जून खोतकर यांना `चकवा` बसलाच.

काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल याच्याकडून खोतकर पराभूत झाले. याचे खापर त्यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर फोडले आणि गेल्या पाच-सहा वर्षापासून पन्हा हे दोघे ऐकमेकांचे विरोधक बनले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी रावसाहेब दानवे यांनी थेट खोतकर यांच्या घरी जाऊन गळाभेट घेतली होती. खोतकरांनीही मदतीचा शब्द दिला, पण विधानसभेच्या निवडणुकीत दानवेंकडून बसलेले घाव खोतकरांच्या डोक्यातून जात नव्हते.

Abdul Sattar, Arjun Khotkar, Raosaheb danve
Abdul Sattar News : मंत्री सत्तारांकडून वाटप करण्यात आलेल्या साड्यांची महिलांकडून होळी

ईडीचा मागे लागलेला ससेमिरा, त्यातून उद्धव ठाकरे यांची साथ सोडून करावे लागलेले बंड या सगळ्याची परतफेड खोतकर यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पडद्यामागे सुत्र हालवून केली. आता पुन्हा विधानसभा निवडणुकीत रावसाहेब दाने खोतकरांच्या विरोधात मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत.

सत्तारांचा करेक्ट कार्यक्रम ?

एकीकडे जालन्यात खोतकर तर दुसरीकडे सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात मंत्री अब्दुल सत्तार यांचा `करेक्ट कार्यक्रम` करण्याची तयारी रावसाहेब दानवे यांनी चालवली आहे. सत्तार आणि दानवे यांच्यातील मैत्री आता संपल्याच जमा असल्याचे चित्र आहे. सिल्लोडमध्ये ऐकमेकांच्या विरोधात मोर्चे काढत तसे चित्र सध्या तरी दोन्ही बाजूंनी निर्माण करण्यात आले आहे.

Abdul Sattar, Arjun Khotkar, Raosaheb danve
Jalna Assembly Election 2024 : खोतकर-गोरंट्याल पुन्हा भिडणार ? दानवे युतीधर्म पाळणार की मैत्री जपणार ?

विधानसभा निवडणूक जाहीर होईपर्यंत सत्तार काय निर्णय घेतील? आणि राजकीय समीकरणं कसे बदलतील? याचा काही नेम नाही. परंतु गेल्या तीस-पस्तीस वर्षापासून सत्तार यांच्यासोबत असलेली दानवे यांची मैत्री लोकसभेतील पराभवानंतर संपुष्टात आली आहे. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात सत्तार यांच्याविरोधात वातावरण पेटायला सुरूवात झाली आहे. आता त्यामागे कोण आहे? हे वेगळे सांगायला नको. मी काही कच्च्या गोट्या खेळत नाही, असे सांगत दानवे यांनी खोतकर-सत्तार या दोघांनीही सावधानतेचा इशारा दिला आहे.

सिल्लोड मतदारसंघात सत्तार यांच्याकडून वाटण्यात आलेल्या साड्यांची दोन गावात होळी करण्यात आली. यावर रावसाहेब दानवे यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त करतांना बायका आमच्या, साड्या तुमच्या असे कसे चालेल? कुठली स्वाभीमानी स्त्री तुमच्या साड्या स्वीकारेल ? सत्तारांनी या आधी कधी मतदारसंघात साड्या वाटल्या होत्या का? विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्तार अमिष दाखवतो का? असा एकेरी उल्लेख करत दानवे यांनी सत्तार यांना अंगावर घेतले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सिल्लोड-सोयगाव आणि जालना या दोन मतदारसंघाकडे संपुर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com