Raosaheb Danve News : राजकारणातले मास्तर असलेल्या रावसाहेब दानवे यांनी घेतली मुलांची शाळा..

Bjp Politics News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष अन् केंद्रात दोनदा राज्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांचे राजकीय वलय कमी झालेले नाही.
Raosaheb Danve news
Raosaheb Danve news Sarkarnama
Published on
Updated on

Jalna News : माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा राजकारणातला प्रदीर्घ अनुभव पाहता त्यांना या क्षेत्रातील हेडमास्तर म्हटले जाते. गावचे सरपंच ते दोन वेळा आमदार, सलग पाच वेळा खासदार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अन् केंद्रात दोनदा राज्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांचे राजकीय वलय कमी झालेले नाही.

भाजप (Bjp) प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठीचे त्यांच्या काळात छक्के पंजे व किस्से सांगून बौद्धिक वर्गामध्ये चांगलेच धडे दिले होते. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी आता शालेय मुलांना धडे देण्याची मोहिम सुरू केली की काय? असा प्रश्न पडत आहे. महिनाभरापासून दानवे यांनी मतदारसंघ पिंजून काढत संवाद, आभार दौऱ्यातून आपला जनसंपर्क कामय ठेवला आहे. त्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा भोकरदन तालुक्याकडे वळवला आहे. (Raosaheb Danve News)

सध्या त्यांनी त्यांच्या मूळ गाव जवखेडा येथील स्वतःच्या संस्थेतील शाळेकडे विशेष लक्ष देणे सुरू केले आहे. ज्या गावातून त्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागली. त्या गावात आधीच त्यांनी राष्ट्रीय महामार्ग नेऊन ठेवला आहे. आता त्यांनी मेट्रो सिटीच्या धरतीवरील शाळांमधील डिजिटल क्लासरूम आणत आधुनिकतेकडे वाटचाल सुरू केली आहे. नुकतीच त्यांनी शाळेला भेट देत मुलांसोबत संवाद साधला.

एवढ्यावर ते थांबले नाही तर थेट डिजिटल बोर्डवर मुलांना शिकवत त्यांना धडेही दिले. दानवे हे केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री होते. या खात्याचा त्यांना चांगला अभ्यास झाला आहे. मुलांची शाळा घेताना त्यांनी या खात्याशी संबंधित गोष्टींचा संदर्भ देत आपले खात्याविषयी असलेले प्रेम आणि ज्ञानही दाखवून दिले. धातू व अधातू यातील फरक कसा ओळखावा हे आपल्या ग्रामीण भाषेत त्यांनी विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने सांगितले.

Raosaheb Danve news
Sakal Survey 2024: महाविकास आघाडीमध्ये कोणाच्या पदरात काय पडलं? काय सांगतो सर्व्हे

टणक व जो वाजतो आणि विजेचा प्रवाह ज्यातून जातो तो असतो धातू. जसे की लोखंड ,तांबे आणि रेल्वेची पटरी आणि संपूर्ण रेल्वे ही धातूची बनलेली असते. ठिसूळ असते व ज्यातून वीज वाहत नाही ते असतात अधातू. जसे की कोळसा, जो फक्त जळतो त्याचा उपयोग वीज बनवण्यासाठी केला जातो, अशी उदाहरणे देत रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी शाळेत धमाल उडवून दिली.

दानवे यांनी घेतलेल्या या शाळेत विद्यार्थी चांगलेच रंगले होते. तर तिथे उपस्थीत शिक्षकांनी दानवेंच्या शिकवण्याची ही पद्धत पाहून तोंडात बोटं घातली. मुलांचा क्लास घेतल्यानंतर रावसाहेब दानवे स्वतः विद्यार्थी बनून त्यांच्यासोबत बसले. आपले शिक्षक विद्यार्थ्यांना कसं शिकवतात याचीही परीक्षा त्यांनी घेतली.

दानवेंच्या या अचानक भेटीमुळे व दौऱ्यामुळे संस्थेतील शिक्षक-कर्मचाऱ्यांना मात्र चांगलाच घाम फुटला होता. दानवे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतील लहानपणीचे किस्से सांगितले व तुम्हाला आता मोठ्या शहरातील तुरळक शाळांमध्ये असणाऱ्या डिजिटल बोर्डावर शिक्षण मिळत आहे, याचा फायदा घ्या, असे आवाहनही केले.

(Edited By : Sachin Wghmare)

Raosaheb Danve news
Sakal Survey 2024 : मुंबई कोणाची? ठाकरेंची की, भाजपची? 'सकाळ'चा सर्व्हे काय सांगतो

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com