Sakal Survey 2024: महाविकास आघाडीमध्ये कोणाच्या पदरात काय पडलं? काय सांगतो सर्व्हे

Sakal Latest Election 2024 Survey News : लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे सर्वच पक्ष अंग झटकून कामाला लागले आहेत.
Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole
Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole Sarkarnama
Published on
Updated on

Sakal Survey 2024 : लोकसभा निवडणुकीचा धक्कादायक निकाल नुकताच लागला आहे. या निवडणुकीत मतदारांनी महायुतीला मोठा झटका दिला आहे. या निवडणुकीत मोठ्या फरकाने महायुतीला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे सर्वच पक्ष अंग झटकून कामाला लागले आहेत.

देशात नागरिकांनी कल बदलत भाजपऐवजी (Bjp) एनडीए आघाडीचे सरकार आणले. देशात पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत. त्यामुळे आता राज्यात कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री असणार यावरून तर्क काढले जात आहेत. त्यासोबतच आता राज्यात कोणत्या पक्षाचे सरकार येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्नांचा आढावा घेणारा हा राज्यातील पहिला सर्व्हे आहे.

राज्यामध्ये घडलेल्या या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर दैनिक सकाळकडून सर्व्हे करण्यात आला. बदललेल्या समीकरणांमध्ये कोणत्या राजकीय पक्षाला सर्वाधिक लाभ झाला याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

2019 च्या सरकार स्थापनेपासून ते 2024 च्या अखेरपर्यंत या राजकीय घडामोडी घडतच राहिल्या. त्यामध्ये कॊणाचा फायदा झाला व कॊणाचा तोटा हे सर्व्हेतून पुढे आले आहे.राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये सत्तेत सर्व पक्षांना सत्ता चाखण्याची संधी मिळाली. कोणताच पक्ष सत्तेपासून दूर राहिला नाही. राज्यामध्ये घडलेल्या या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर दैनिक सकाळकडून सर्वे करण्यात आला. यामध्ये बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये कोणत्या राजकीय पक्षाला सर्वाधिक लाभ झाला याचा कानोसा घेतला आहे.

Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole
Video Ajit Pawar : हौसे, नवसे, गवसे येतील, विश्वास ठेवू नका; बारामतीतून अजित पवारांचा रोख कुणाकडे?

यावेळी महाविकास आघाडीचा (MVA) सर्वाधिक लाभ कोणत्या पक्षाला झाला असा प्रश्न नागरिकांना विचारण्यात आला असता काँग्रेसला सर्वाधिक लाभ झाल्याचे दिसून आले. राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याने काँग्रेसला सत्तेचा लाभ मिळाला. त्यामुळे काँग्रेसला (Congress) संजीवनी मिळाली.

37.1 टक्के मतदारांनी महाविकास आघाडीत काँग्रेसला लाभ झाल्याचं म्हटलं आहे. तर 18.5 टक्के जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाला लाभ झाल्याचे म्हटले आहे, तर शिवसेनेला 13.60 टक्के लोकांनी लाभ झाल्याचे म्हटले आहे. तर सर्वच घटक पक्षांना समान फायदा मिळाल्याचे 30.8 टक्के लोकांनी म्हटले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांचा उद्धव ठाकरे यांनी झंझावाती प्रचार केला होता. त्यामुळे राज्यामध्ये सर्वाधिक काँग्रेसचे खासदार निवडून आले आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे 13 खासदार निवडून आले तर त्याखालोखाल शिवसेना ठाकरे गटाचे 9 खासदार निवडून आले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आठ खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे त्याचा सर्वाधिक फायदा काँग्रेसला झाल्याचा दिसत आहे.

Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole
Mlc Election 2024 : गद्दारांना क्षमा नाही, फुटीर आमदारांबाबत काँग्रेसच्या हायकमांडचे मोठे आदेश

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com