Raosaheb Danve News : रावसाहेब दानवेंचा मोठा दावा; म्हणाले,'' मोदींनी कोरोनाची सहा महिने आधीच तयारी केलेली...''

Politics News : ...त्यावेळी उद्धव ठाकरे यांची दातखिळी बसली होती का?
Raosaheb Danve News
Raosaheb Danve NewsSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : भाजप नेते व केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे हे त्यांच्या हटके भाषणशैली व रोखठोक विधानांमुळे राजकीय वर्तुळात कायमच चर्चेत असतात. आता त्यांनी जगभरासह भारतातही तीन वर्षांपूर्वी थैमान घातलेल्या कोरोनाविषयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत मोठा दावा केला आहे. कोविड येण्याच्या सहा महिने आधीच पंतप्रधान मोदींनी त्याची तयारी केली होती असा म्हटलं आहे. या दाव्यावर आता राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

रावसाहेब दानवे( Raosaheb Danve ) हे शेतकरी मेळाव्याला उपस्थित होते.यावेळी त्यांनी आपल्या नेहमीच्या खासशैलीत ही फटकेबाजी केली.दानवे म्हणाले, कोविड येण्याआधीच मोदींनी सहा महिने आधी तयारी केली होती. लस नव्हती ती तयार केली. जगाला पोहोचवली. देशात मोफत लस दिली, असं सांगतानाच पाकिस्तानात 250 रुपये किलो गहू पीठ आहे. भारतात मात्र मोदींनी गहू फुकट दिले असंही दानवे यावेळी म्हणाले.

Raosaheb Danve News
Barshitakali News : नऊ नगरसेवकांचा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध, शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट !

सत्तार यांचा राजकारणातला मी आजोबा...

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली . दानवे म्हणाले, मी राजकारणातला आजोबा आहे. मी कर्नाटकात होतो. सत्तार म्हणाले, कार्यक्रमाला यावे लागते. मी आलो. नवीन नवरी सासरी आली की स्वयंपाक कसा करायचा माहीत नसते. ती सासूला विचारते तिखट मीठ किती टाकू? आणि सासूने सुचवल्या प्रमाणे स्वयंपाक करते, अशी तुफान फटकेबाजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.

सरकार शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi)यांनी 2014नंतर पीक विम्याचे नियम बदलले. त्यामुळे शेतकरी विमा भरायला लागले. शेतकऱ्यांना विमाही मिळू लागला. उद्धव ठाकरे हातवर करून शेतकऱ्यांवर बोलतात. यांना शेती माहीत आहे का? उद्धव ठाकरे यांना विचारा बटाटे जमिनी खाली येतात की वर? हरभऱ्याचे घाटे खालून येतात की वरून? असा हल्ला रावसाहेब दानवे यांनी चढवला.

Raosaheb Danve News
Shirdi Breaking News : साईभक्तांसाठी मोठी बातमी! १ मेपासून बेमुदत शिर्डी बंदची हाक; काय आहे कारण?

...त्यावेळी उद्धव ठाकरे यांची दातखिळी बसली होती का?

मी, चंद्रकांतदादा, देवेंद्र फडणवीस आम्ही होतो. उद्धव ठाकरे आणि अमित शाह घरात गेले. बंद दाराआड चर्चा केली. दोघे अर्ध्या तासात बाहेर आले आणि मीडियासमोर युती झाल्याचं जाहीर केलं. भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे स्टेजवरून जाहीर केलं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांची दातखिळी बसली होती का? असा सवाल दानवे यांनी केला.

नाव असते पण पक्ष कुणाच्या बापाचा नसतो. पक्ष कार्यकर्त्यांचा असतो, असं त्यांनी सांगितलं.शिक्षक भेटले की, आमचे कुटुंब आमचे जबाबदारी. शेतकरी भेटले तरी म्हणायचे माझे कुटुंब माझी जबाबदारी. यांनी अडीच वर्षे काय केले? तर घरात बसले असा टोलाही दानवेंनी ठाकरेंना लगावला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com