Maratha Reservation : लक्ष्मण हाकेंना भेटलेल्या आमदाराला मराठा आंदोलकांनी आडवले, म्हणाले, 'जरांगे चार वेळा आले तुम्ही...'

Maratha Reservation Ratnakar Gutte : एसईबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी प्रमाणपत्र मिळणे अवघड झाले आहे. मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळायला उशीर होतो, त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण होते, अशा समस्यांचा पाढाच मराठा तरुणांनी वाचला.
 Ratnakar Gutte
Ratnakar Guttesarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. गावामध्ये, कार्यक्रमांमध्ये राजकीय नेत्यांना आडवून मराठा आरक्षणा विषयी त्यांची भूमिका मराठा तरुण विचारत आहेत.

लक्ष्मण हाके हे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीच्या विरोधात आंदोलन करत असताना त्यांची ओबीसी नेते, आमदारांनी भेट घेतली होती. त्यावरून गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना मराठा तरुणांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

आमदार गुट्टे पूर्णा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना चुडावा गावात त्यांना मराठा तरुणांनी अडवत मराठा आरक्षणासंदर्भात जाब विचारला. आम्ही तुम्हाला मतदान केले म्हणूनच तुम्ही आमदार झाला. मराठा आरक्षणावर तुम्ही तुमची भूमिका जाहीर केली नाही.

जरांगे पाटील चार वेळा गंगाखेड विधानसभा मतदारसंघात येऊन गेले पण तुम्ही त्यांची भेट घेतली नाही. त्यांना जाहीर पाठींबा दिला नाही, असे मराठा तरुण म्हणाले.

 Ratnakar Gutte
Ajit Pawar : 'आधी माझी चूक साहेब सांभाळून घेत, आता...'; अजित पवार नेमके काय म्हणाले?

तरुणांनी वाचला समस्यांचा पाढा

मराठा समाजाला सवलती मिळत नाहीत. एसईबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी प्रमाणपत्र मिळणे अवघड झाले आहे. मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळायला उशीर होतो त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण होते, असे मराठा तरुण म्हणाले. तुम्ही लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी वडीगोद्री येथे गेला. त्यांना पाठींबा दिला. आम्ही तुम्हाला मतदान केले नाही का? असा थेट सवाल मराठा आंदोलकांनी आमदार गुट्टेंना विचारला.

 Ratnakar Gutte
Supriya Sule Politics: कांद्यासाठी सुप्रिया सुळेंचा दिल्लीशी संघर्ष, अजित पवार मात्र मागताहेत माफी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com