BJP News : शहराध्यक्ष कसा असावा ? भाजपा कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे कान टोचले!

BJP Working President Ravindra Chavan outlined the qualities and responsibilities expected from city and district presidents during a party event. : आपण मंडळ अध्यक्ष नियुक्त केले. आता जिल्हाध्यक्ष निवडायचा आहे. निश्चित केलेल्या प्रक्रिये प्रमाणे ही निवड होईल.
BJP Leader Ravindra Chavan Meeting In Chhatrapati Sambhajinagar
BJP Leader Ravindra Chavan Meeting In Chhatrapati SambhajinagarSarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : मराठवाड्यासह महाराष्ट्रातील मंडळाध्यक्षांची निवड झाल्यानंतर आता भाजपाने आपले लक्ष शहराध्यक्षांच्या निवडीवर केंद्रित केले आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात शहराध्यक्ष कसा असावा? या संदर्भात मार्गदर्शन करताना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे कान टोचले. पक्षासाठी वेळ देणारा, गट-तट न करणारा, सर्वांना सोबत घेऊन चालणारा शहराध्यक्ष असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत संभाजीनगरमध्ये पदाधिकारी मेळावा आज पार पडला. माजी मंत्री रावसाहेब दानवे, ओबीसी मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड,आमदार विक्रांत पाटील, संजय केणेकर,नारायण कुचे, प्रशांत बंब, अनुराधा चव्हाण यांची बैठकीला उपस्थिती होती.

आपण मंडळ अध्यक्ष नियुक्त केले. आता जिल्हाध्यक्ष निवडायचा आहे. निश्चित केलेल्या प्रक्रिये प्रमाणे ही निवड होईल. (BJP) पक्षाला वेळ देणारा जिल्हाध्यक्ष असावा, गट-तट न करता सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा तो असावा. तो तुम्हाला शोधायचा आहे, असे चव्हाण म्हणाले. तो नेता नसेल तरी चालेल पण पक्षासाठी प्रामाणिक काम करणारा असावा, अशी अपेक्षा चव्हाण यांनी बैठकीत व्यक्त केली.

BJP Leader Ravindra Chavan Meeting In Chhatrapati Sambhajinagar
Shirdi BJP Meeting : भाजप मंडलाध्यक्ष नियुक्त्या नियम डावलून? जिल्हाध्यक्ष पदासाठी शिंदे अन् विखे गटात कुरघोड्या; कार्याध्यक्ष चव्हाण शिर्डीत दाखल

लोकसभेत विरोधकांच्या फेक नॅरेटीव्हमुळे आपल्याला अपेक्षित यश मिळाले नाही. विधानसभा निवडणूकीत संघ आणि समविचारी संघटनांनी, ठिकठिकाणी बैठका घेतल्या. सरकार का हवे? पटवून दिले. त्यानंतर आपल्याला विधानसभेत यश मिळाल्याचे चव्हाण म्हणाले. यावेळी रावसाहेब दानवे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

BJP Leader Ravindra Chavan Meeting In Chhatrapati Sambhajinagar
Devendra Fadnavis On Marathwada Drought : मराठवाड्यातील आजच्या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला पहावा लागणार नाही! मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द

बस्ती चलो अभियान

26-28 एप्रिल दरम्यान शंभर कार्यकर्ते निश्चित करावे. प्रत्येकाने आठ तास द्यायचे आहेत. यात बस्ती चालो अभियान राबवायचे. या अंतर्गत प्रत्येक बुथवर जात वॉर्ड वाटून घेऊन, तेथील मंदिरांची स्वच्छता करायची. नागरिकांशी संपर्क करायचा, त्यात त्यांना शासकीय योजना बद्दल माहिती द्यायची, असे आदेशही रविंद्र चव्हाण यांनी बैठकीत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com