Vidhan Parisad News : विधान परिषदेत विक्रमी कामकाज, सदस्यांची उपस्थितीही लक्षणीय..

Nilam Gorhe : तर सभागृहात मंत्री हजर नसल्यामुळे १ तास ५५ मिनिटांचे कामकाज तर अन्य कारणांमुळे १ तास ५७ मिनिटे वाया.
Vidhan Bhavan Mumbai News
Vidhan Bhavan Mumbai NewsSarkarnama
Published on
Updated on

Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आज सूप वाजले, दरम्यानच्या काळात विधान परिषदेत विक्रमी कामकाज झाल्याचे सांगत सदस्यांच्या लक्षणीय उपस्थितीबद्दल सभापती डाॅ. निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी सभागृहाचे अभिनंदन केले. अंतिम आठवडा प्रस्तावावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिल्यानंतर सभागृहाचे शेवटच्या दिवशीचे कामकाज साधरणतः साडेपाचच्या सुमारास संपले. राष्ट्रगीताने अधिवेशनाची सांगता झाली.

Vidhan Bhavan Mumbai News
Devendra Fadanvis News : महाविकास आघाडीपेक्षा आमच्या काळात कायदा व सुव्यवस्था सुधारली..

तत्पुर्वी सभापती निलम गोऱ्हे यांनी अधिवेशन काळात सभागृहात झालेल्या कामकाजाची माहिती सभागृहासमोर ठेवली. (Maharashtra Budget) त्यानूसार विधान परिषदेत कामकाजासंदर्भात एकूण १८ बैठका झाल्या. तर एकूण कामकाज १२५ तास २० मिनिटे एवढे झाले. त्यामुळे सभागृहाचे सरासरी रोजचे काम ६ तास ५७ मनिटे एवढा वेळ चालले.

तर सभागृहात मंत्री हजर नसल्यामुळे १ तास ५५ मिनिटांचे कामकाज तर अन्य कारणांमुळे १ तास ५७ मिनिटे वाया गेल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. अधिवेशना दरम्यान, १८५६ तारांकित प्रश्न, ९३ सूचना २०५ , तर २६० चे ४ प्रस्तावा मांडले गेले आणइ त्या सर्वांवर विक्रमी चर्चा झाल्याबद्दल गोऱ्हे यांनी सभागृहाचे अभिनंदन केले.

२८९ चे ६८ तर मांडण्यात आलेल्या लक्षवेधींची संख्या ही ७९५ एवढी होती. सभागृहाच्या कामकाजात सहभाग नोंदवण्यात देखील सदस्यांचा उत्साह पहायला मिळाला. सदस्यांच्या सभागृहातील उपस्थितीचे प्रमाण ९१.२२ टक्के एवढे नोंदवले गेले. तर कमीत कमी उपस्थिती ही ५५ टक्के एवढी होती. उपस्थितीचे सरासरी प्रमाण हे ८० टक्के एवढे होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com