Latur District News : लातूर जिल्हा निर्मितीची आठवण ठेवत विलासरावांनी अंतुलेंना बोलावले..

Vilasrao Deshmukh News : आजवर लातूर जिल्ह्याने राज्याच्या व देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले.
Latur District News
Latur District News Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : आजपासून ४१ वर्षांपुर्वी म्हणजेच १६ ऑगस्ट १९८२ रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली. (Latur District News) चाळीशी ओलांडलेला लातूर जिल्हा कला, क्रिडा, शिक्षण, सांस्कृतिक, औद्योगिक, शेती अशा सर्वच क्षेत्रात अग्रेसर झाला आहे. शिक्षण क्षेत्रात `लातूर पॅटर्न` ने आपला झेंडा रोवला तो आता सातासमुद्रापलिकडेही फडकत आहे.

Latur District News
Latur Political News: पालकमंत्री म्हणून कुणी काय केले? एकदा होऊन जाऊ द्या ; निलंगेकरांनी बॅंड वाजवला..

या ऐतिहासिक दिनानिमित्त जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. (Latur) लातूर जिल्हा निर्मितीसाठी आग्रही राहिलेले माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासरावर देशमुख, (Vilasrao Deshmukh) शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि ज्यांच्या मंजुरीमुळे मराठवाड्यात लातूरच्या रुपाने नव्या जिल्ह्याची भर पडली त्या. बॅ. ए.आर. अंतुले यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आमदार अमित व धीरज देशमुख यांनी लातूर जिल्हा निर्मितीच्या आठवींना उजाळा दिला आहे.

लातूर जिल्ह्याची निर्मिती होऊन आज ४१ वर्षे पूर्ण होत आहेत. (Marathwada) या काळात शिक्षण,सहकार,उद्योग,कृषी,नृत्य आणि क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याने नवनवे उच्चांक गाठले आहेत. यापुढेही अशीच घोडदौड कायम असावी ही सदिच्छा. जिल्हा निर्मिती दिनाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! १६ ऑगस्ट १९८२ रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन लातूर हा नवीन जिल्हा निर्माण झाला.

आमदार असताना आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांनी केलेल्या प्रयत्नांची व पाठपुराव्याची दखल घेवून तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय ए. आर. अंतुले साहेबांनी ही घोषणा केली. पुढे मुख्यमंत्री झाल्यानंतर विलासराव देशमुख साहेबांनी लातूर जिल्हा निर्मितीच्या रौप्य महोत्सवी समारंभाला माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले साहेबांना विशेष आमंत्रित केले. यावेळी अंतुले साहेबांचे शब्द होते.. "राजकारणात २५ दिवसांची आठवण कोणी ठेवत नाही. विलासरावजी, तुम्ही २५ वर्षांपूर्वीचे लक्षात ठेवून मला इथे बोलावले. तुमचा हा दिलदारपणा मी विसरू शकत नाही`, अशी आठवण धीरज देशमुख यांनी या निमित्ताने सांगितली.

तसेच लातूर जिल्हा निर्मिती दिनाच्या सर्व लातूरकरांना शुभेच्छाही दिल्या. आजवर लातूर जिल्ह्याने राज्याच्या व देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले. १६ ऑगस्ट लातूर आणि जालना जिल्हा निर्मितीचा दिवस. या दोन जिल्हा निर्मितीचे जनक कै .डॉ.स्व.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या आग्रहाखातर तत्कालीन मुख्यमंत्री स्व. अंतुले साहेब यांनी त्वरीत मंजुरी दिली आणि स्व.विलासराव देशमुखसाहेब यांच्या जडणघडणीतून लातूर जिल्हा घडला. या जिल्हा निर्मितीच्या निमित्ताने तिन्ही महान नेत्यांना लातूरकरांचा मानाचा मुजरा, अशा शब्दात लातूर जिल्हा निर्मितीचा आनंद साजरा केला जात आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com