Maratha Reservation News : आधी आरक्षण; मगच सरकारी कार्यक्रम, मराठा तरुण आक्रमक...

Jalna News : परतूर तालुक्यातील आष्टी, सातोना येथील सरकारी सोहळा मराठा तरुणांनी उधळला.
Maratha Reservation News
Maratha Reservation NewsSarkarnama

Marathwada Political News : मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन पुन्हा उग्ररूप घेऊ पाहत आहे. मुंबईत आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील एक तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर समाजामध्ये संतापाचे वातावरण आहे. याचा फटका सरकारी कार्यक्रमांना बसू लागला आहे. (Jalna Protest News) भाजपचे आमदार माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत सातोना आणि कुंभारपिंपळगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचा ऑनलाइन उद्घाटन सोहळा मराठा तरुणांनी आज उधळून लावला.

Maratha Reservation News
Maratha Reservation News : मराठा तरुणांनो टोकाचे पाऊल उचलू नका..

मराठा आरक्षणावर निर्णय होत नाही, तोपर्यंत सरकारी कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशाराच या वेळी संतप्त तरुणांनी दिला. (Maratha Reservation) परतूर तालुक्यातील आष्टी आणि सातोना या ठिकाणी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. गुरुवारी सायंकाळी ४ वाजता ऑनलाइन पद्धतीने या केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार होते. (BJP) या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा हे ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहणार होते.

तर स्थानिक आमदार बबनराव लोणीकर यांच्यासह स्थानिक भाजपचे पदाधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणार होते. सातोना आणि आष्टी या दोन्ही ठिकाणी मोठे शामियाने कार्यक्रमासाठी उभारण्यात आले होते. (Marathwada) भाजपच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले होते. यासाठी वेगवेगळ्या गावांतून वाहनांची व्यवस्थाही करण्यात आली होती. या कार्यक्रमाची स्थानिक मराठा तरुणांना माहिती मिळाल्यानंतर मोठ्या संख्येने त्यांनी कार्यक्रमस्थळी धडक दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कुठल्याही परिस्थितीत कार्यक्रम होऊ देणार नाही, असा पवित्रा मराठा युवकांनी घेतला. आष्टी येथील कार्यक्रमाला आमदार बबनराव लोणीकर स्वतः उपस्थित राहणार होते. तयारीचा आढावा घेण्यासाठी तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे दुपारी १२ पासूनच आष्टीत दाखल झाल्या होत्या. तहसीलदार गोरे यांनी सदरील कार्यक्रम शासकीय असल्याचे सांगत कार्यक्रम होऊ देण्याची विनंती केली.

पण संतप्त तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तरुणांचा आक्रमक पवित्रा पाहता प्रशासनाला माघार घ्यावी लागली. त्यानंतर आमदार बबनराव लोणीकरांनीही त्यांचा आष्टी दौरा रद्द केल्याचे बोलले जाते. परंतु आपला असा कुठलाही दौरा नियोजित नव्हता, असे स्पष्टीकरण लोणीकर यांच्या वतीने करण्यात आले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com