Riteish Deshmukh News : 'अमित भैया आता ती वेळ आली आहे, तुम्ही ते पाऊल उचललं पाहिजे'

Riteish Deshmukh and Amit Deshmukh News : जाहीर कार्यक्रमात रितेश देशमुखांच्या सूचक विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riteish Deshmukh
Riteish Deshmukh Sarkarnama
Published on
Updated on

Latur News : विलास सहकारी साखर कारखान्याकडून आयोजित कार्यक्रमात बोलताना दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि चित्रपट अभिनेते रितेश देशमुख हे वडिलांच्या आठवणींमध्ये भावूक झाल्याचे दिसून आले. या वेळी भाषणात शेवटी रितेश देशमुख यांनी त्यांचे ज्येष्ठ बंधू अमित देशमुख यांना उद्देशून एक विधान केलं, ज्यावरून सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहेत.

रितेश देशमुख म्हणाले, 'अमित भैया तुमच्याकडून लातूरच्या तर खूप अपेक्षा आहेतच. पण मला वाटतंय की तुमच्याकडून महाराष्ट्राच्याही खूप अपेक्षा आहेत आणि आता ती वेळ आलेली आहे, की तुम्ही ते पाऊल उचललं पाहिजे. तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Riteish Deshmukh
Latur Congress News : जिथे आहात, तिथेच खंबीरपणाने उभे राहा, काकांचा पुतण्यांना सल्ला

याशिवाय 'आजकाल राजकारणात कुठल्या कुठल्या पातळीपर्यंत भाषणं जातात, हे पाहून खरंच दु:ख होतं, की जो महाराष्ट्र एकेकाळी दिग्गज नेत्यांनी गाजवला आहे. त्यांच्या भाषणांनी गाजवला आहे. तो काळ आता आपल्याला फारसा दिसत नाही. तो काळ आपल्याला परत आणण्याची गरज आहे,' असंही या वेळी रितेश देशमुख यांनी मत व्यक्त केलं.

लातूरमधील निवळा येथील विलास साखर कारखाना आणि तिथे उभारण्यात आलेल्या दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळण्याचा अनावरणाचा कार्यक्रम लक्षवेधी ठरला. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर निवळी येथील कार्यक्रमाला राज्यातील सर्वच काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी हजेरी लावली आणि मराठवाड्यातील काँग्रेसचे नेतृत्व लातूरच्या देशमुखांच्याच हाती येणार असल्याचे संकेत दिले.

Riteish Deshmukh
Latur Politics : निंलगेकरांचे फुल, श्रृंगारेची ऑफर अन् आमदार काळेंचा सल्ला देशमुख मनावर घेतील का ?

या प्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अमित देशमुख यांना आता बाहेर पडा, राज्यात फिरा आणि काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा, हे केलेले आवाहनही मराठवाड्यातील काँग्रेसची पुढील दिशा आणि त्याचे नेतृत्व कोण करणार? हे दर्शवणारे होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com