Rohit Pawar In Marathwada : रोहित पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर; पक्षाच्या पडझडीनंतर संघटना बांधणीवर कसा देणार जोर ?

Rohit Pawar In Action Mode : "उर्वरित गटाला कशा प्रकारे बूस्टर देणार या कडे सर्वांचे लक्ष असणार आहे."
Rohit Pawar
Rohit Pawar Sarkarnama

Dharashiv News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटाने बंड करून शिंदे-फडणवीसांच्या सत्तेत सहभागी झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्याच्या बालेकिल्यातच काहीशी मरगळ आली आहे. एकेकाळी धाराशिव जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यामुळे मराठवाड्यातील युवा पिढीला पुन्हा एकदा सक्रिय करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते धाराशिव व बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. (Latest Marathi News)

Rohit Pawar
Minister Abdul Sattar : निवडणूक जवळ आली, हात जोडण्याची वेळ झाली..!

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची लवकरच बीडमध्ये सभा होणार आहे. या सभेची तयारी करण्यासाठी आमदार रोहित पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत. रविवारी रोहित पवार हे तुळजापूरमध्ये येऊन तुळजाभवानीं मातेचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर धाराशिव येथे पत्रकार परिषद घेत ते संवाद साधणार आहेत.

या पूर्वी धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. शरद पवार यांचे नातेवाईक असलेले डॉ. पदमसिंह पाटील व राणा जगजितसिंह पाटील मंत्री होते. डॉ पदमसिंह पाटील एक टर्म राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार म्हणून निवडून आले हॊते. तर राणा पाटील व राहुल मोठे हे दोन आमदार असल्याने धाराशिव जिल्ह्याची ओळख राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी होती. मात्र मधल्या काळात पाणी पुलाखालून गेले आहे. डॉ पदमसिंह पाटील हे भाजपमध्ये गेले तर अजित पवार गट भाजपसोबत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यात वाताहत झाली आहे.

Rohit Pawar
Solapur Politics : राष्ट्रवादी प्रवेशावेळी शरद पवारांनी मला हा शब्द दिला होता;महेश कोठेंनी उघड केले गुपित

त्यामुळे आता येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा गड सांभाळण्याची जबाबदारी रोहित पवार यांच्यावर आली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी महेंद्र धुरगुडे यांच्याकडे असली तरी पक्षाला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी ही जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापसिंह पाटील की प्रांत कार्यकारिणीचे सदस्य अशोक जगदाळे यांच्याकडे देणार याकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे आता उर्वरित गटाला कशा प्रकारे बूस्टर देणार या कडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com