मुंबई : शिवसंग्रमचे (Shivsangram ) नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं आज पहाटे अपघाती निधन झाल्याची दुःखद बातमी सकाळी जेव्हा मला कळाली ती ऐकून मला धक्का बसला. याआधी अरबी समुद्रामध्ये स्मारकासाठी जागा बघत असताना त्यांच्यावर असा प्रसंग आला होता. मात्र त्यामध्ये ते बचावले होते. मात्र आज मृत्यूने डाव साधला आणि आज मराठा समाजासाठी लढणारा, प्रेम असणारा नेता आमच्यातून निघून गेला,अशा शोकभावना राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी व्यक्त केल्या. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. (Vinayak Mete & Sadabhau Khot Latest News)
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे आज पहाटे ‘पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे’वर अपघाती मृत्यू झाला. यानंतर सदाभाऊ खोत यांनी 'साम टिव्ही'ला आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी ते भावूक झाले होते. मेंटेंबद्दलच्या आठवणी सांगतांना तर त्यांना अश्रू अनावर झाले होते.
सदाभाऊ आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, आज सकाळी अपघाती निधनाची बातमी जेव्हा मला कळाली ती ऐकून मला धक्का बसला. याआधी अरबी समुद्रामध्ये स्मारकासाठी जागा बघत असतांनाही त्यांच्यावर असा प्रसंग आला होता. मात्र त्यामध्ये ते बचावले होते. मात्र आज मृत्यूने डाव साधला आणि मराठा समाजासाठी लढणारा, प्रेम असणारा नेता आमच्यातून निघून गेला. आयुष्यभर मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. आरक्षण मिळाला पाहिजे. यासाठी मेटे लढत राहिले. एखाद्या विषयाचा ध्यास कसा घ्यावा हे उत्तम उदाहरण त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रामध्ये व्हावं यासाठी सुद्धा ते लढत राहिले. मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी सभागृहात आणि बाहेरही ते लढत राहिले. ते आमच्या घटक पक्षाचे नेते होते. सर्व घटक पक्षांना एकत्रित ठेवून ते सरकारच्या विरोधात असो किंवा सरकार सोबत असो ते चालत होते. सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन ठेवण्याच कौशल्य त्यांच्याकडे होतं. ते आज आमच्यातून निघून गेले याचं मोठं दुःख आहे. मी त्यांना महाराष्ट्रातील कष्टकरी जनतेच्या वतीने आणि रयत क्रांती मोर्चाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो अशी, शोकभावना सदाभाऊंनी व्यक्त केली.
पुढे मेटे यांच्याबद्दलची आठवण सांगितली ते म्हणाले, ज्यावेळी मी आमदार झालो त्यावेळी महादेव जानकर आणि विनायक मेटे माझ्या गावात सत्कारासाठी आले होते. त्यावेळी माझ्या गावातील युवक आणि नागरिकांनी मेटे साहेबांना पाच दहा मिनिट नाही तर सुमारे पाच तास खांद्यावर घेऊन नाचत होते. त्यावेळी ते मला म्हणाले की, खरोखर या गावाने सदाभाऊ तुमच्यावर प्रेम केलं आहे. असं प्रेम मी कधी पाहिलं नाही, असे मेटे म्हणाले होते, अशी आठवण त्यांनी सांगितली. यानंतर अनेक मीटिंगमध्ये आम्ही एकत्र यायचो त्यावेळी ते नेहमी म्हणायचे आपण सर्वांनी एकसंघ राहिला पाहिजे, अशी ते भूमिका मांडायचे असं म्हणत असतांना सदाभाऊंना अश्रू अनावर झाले आणि ते समोर बोलू शकले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.