Sandip Kshirsagar : विद्यापीठ अधिसभेच्या गोंधळासमोर आमची विधानसभाही फिक्की! आमदार संदीप क्षीरसागर यांचा टोला

MLA Sandip Kshirsagar Criticise : एक तास हा सदस्यांना कमी पडतो. तो प्रश्‍नोत्तराचा तास वाढवण्यासाठी तुम्ही प्रस्ताव द्या. त्यासाठी कायद्यातील दुरुस्तीसाठी प्रयत्न करू.
MLA Sandip Kshirsagar Reaction News
MLA Sandip Kshirsagar Reaction NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार संदीप क्षीरसागर यांनी विद्यापीठ अधिसभेच्या बैठकीतील गोंधळावर उपरोधिक टीका केली.

  2. त्यांनी विधानसभेच्या कार्यवाहीला विद्यापीठाच्या अधिसभेपेक्षाही फिक्के असल्याची उपमा दिली.

  3. या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात चर्चा रंगली आहे.

योगेश पायघन

Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University : आमचे विधानसभेचे अधिवेशनही या अधिसभेच्या बैठकीसमोर फिक्के आहे, अशा शब्दांत अधिसभेतील गोंधळावर बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी टोला लगावला. पहिल्यांदाच आलो, पुढच्या बैठकीत अभ्यास करून बोलू. विद्यापीठाशी संबंधीत विषय, अधिसभेतील प्रस्ताव, मागण्या तसेच पुरग्रस्त परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफिसाठी पाठपुरावा करू, असे आश्‍वासन क्षिरसागर यांनी दिले.

बीड विधानसभेचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर नामनिर्देशित करण्यात आली आहे. पहिल्याच बैठकीला ते उपस्थित राहिले. तासभर प्रश्नोत्तराच्या तासातील गोंधळ पाहिल्यावर विधानसभा अधिवेशनही अधिसभेच्या गोंधळासमोर फिक्के पडेल, असा चिमटा त्यांनी काढला.

एक तास हा सदस्यांना कमी पडतो. तो प्रश्‍नोत्तराचा तास वाढवण्यासाठी तुम्ही प्रस्ताव द्या. त्यासाठी कायद्यातील दुरुस्तीसाठी प्रयत्न करू, असे म्हणत सर्व सदस्यांना संधी मिळावी,असेही ते म्हणाले. विधानसभेचे (Vidhan Sabha) अध्यक्ष अॅड राहूल नार्वेकर यांनी संदीप क्षीरसागर यांचे नाव विद्यापीठाच्या अधिसभेवर नामनिर्देशित केले असून महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव घ. ज्ञा. देबडवार यांनी सदर नामनिर्देशन केल्याचे पत्राद्वारे कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी कळविले आहे.

मंगळवारी (ता.30) बैठकीसाठी ते पहिल्यांदा उपस्थित राहिले. विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. या बैठकीत आमदार क्षीरसागर यांचा कुलगुरुंनी ग्रंथ भेट देऊन सत्कार केला. प्रश्‍नोत्तराचा तास, चर्चा, सुचनांमध्ये चढाओढ त्यात सदस्यांचा गोंधळ अडीच तासच्या बैठकीत दिसून आला.

काही अपवाद वगळता जणू काही हा सगळा गोंधळ ठरवून केला जातोयं की काय? अशी शंका येत होती. प्रशासनानेही कोणत्याही मुख्य विषयांवर चर्चा होणार नाही, याची पुर्ण काळजी घेतल्याचे दिसून आले. रोष कमी करण्यासाठी काही प्रस्ताव मांडून घेण्यात आले. मात्र, या बैठकीतून फलनिष्पत्ती पेक्षा केवळ विद्यापीठीय राजकारण दिसून आल्याची चर्चा आहे.

5 FAQs

Q1. संदीप क्षीरसागर यांनी काय वक्तव्य केले?
➡️ त्यांनी विधानसभेचे अधिवेशन विद्यापीठातील अधिसभेच्या गोंधळापुढे फिक्के असल्याचे म्हटले.

Q2. संदीप क्षीरसागर कोणत्या पक्षाचे आमदार आहेत?
➡️ ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आहेत.

Q3. हे वक्तव्य कुणाच्या विरोधात केले गेले आहे?
➡️ डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेतील गोंधळाच्या विरोधात केलेआहे.

Q4. या वक्तव्यावर कोणती प्रतिक्रिया उमटली?
➡️ विरोधकांनी या वक्तव्याला समर्थन दिले, तर सत्ताधाऱ्यांत नाराजी आहे.

Q5. विधानसभेचे अधिवेशन फिक्के का म्हटले गेले?
➡️ कारण कार्यवाहीत ठोस चर्चा आणि निर्णयांची कमतरता असल्याचे क्षीरसागरांनी सूचित केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com