Sandipan Bhumre Oath : गडकरींना नमस्कार अन् आत्मनिर्भर भारतासाठी कटिबद्ध; भुमरे नेमके काय म्हणाले?

Aurangabad MP : लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले आहेत. मराठवाड्यातील महायुतीचे ते ऐकमेव खासदार आहेत.
Sandipan Bhumre Oath
Sandipan Bhumre OathSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Political News : छत्रपती संभाजीनगर : पैठण विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार, राज्यातील महाविकास आघाडी आणि त्यानंतरच्या शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये मंत्री राहिलेले शिवसेनेचे संदीपान भुमरे यांनी आज खासदार म्हणून शपथ घेतली. पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या नेहमीच्या पेहरावात संसेदत पहिले पाऊल ठेवणाऱ्या भुमरे यांनी मराठीतून शपथ घेतली.

लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून संदिपान भुमरे Sandipan Bhumre पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले आहेत. मराठवाड्यातील महायुतीचे ते ऐकमेव खासदार आहेत. खासदार म्हणून शपथ घेतल्यानंतर भुमरे यांनी समोरच बसलेले केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना नमस्कार केला. त्यांच्या शेजारी समोरच्या बाकावर बसलेले मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि यावेळी खासदार म्हणून निवडून आलेले शिवराजसिंह चौहान यांनाही भुमरे यांनी नमस्कार घातला.

अठराव्या लोकसभेचा सदस्य म्हणून मराठीत शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विकसित आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कटिबद्ध राहू, अशी ग्वाही भुमरे यांनी समाज माध्यमावरील पोस्टद्वारे दिली. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि पक्षांच्या फाटाफुटीनंतरच्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला.

भाजपने या जागेवर दावा सांगितल्यामुळे भुमरे यांची उमेदवारी उशीराने जाहीर झाली, पण महायुतीच्या एकत्रित प्रयत्नातून ते विजयी झाले. एमआयएमचे इम्तियाज जलील आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि उमेदवार चंद्रकांत खैरे Chandrakant Khaire यांचा भुमरे यांनी पराभव केला. संपूर्ण मराठवाड्यात मराठा आरक्षणामुळे सत्ताधारी महायुती विरोधातील रोष मतांच्या रुपातून बाहेर पडला. पण संभाजीनगरात संदीपान भुमरे यांना मात्र त्याचा फटका न बसता उलट फायदाच झाला.

भुमरे यांच्या विजयाने मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरवर शिवसेना शिंदे गटाची पकड आणखी मजबूत होण्यास मदत मिळणार असल्याचा दावा केला जातोय. राज्यात रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री म्हणून संदीपान भुमरे यांनी अनेक महत्वाचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेतले. आपल्यामुळे हे अडगळीत पडलेले खाते नावारुपाला आल्याचा दावा भुमरे यांनी अनेकदा केला. आता जिल्ह्याचा खासदार म्हणून मतदारांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचे भुमरे यांनी म्हटले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com