Sanjana Jadhav News : दहा वर्ष घरात आमदारकी माझ्यामुळेच ; आता जनता माझ्या पाठीशी..

Kannad : जनता आता माझ्या पाठीशी आहे, असे सांगत त्यांनी विरोधकांना इशारा दिला.
Harshvardhan Jadhav-Sanjana News, Aurangabad
Harshvardhan Jadhav-Sanjana News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad : संजना जाधव यांनी कन्नड तहसिल कार्यालयावर काढलेल्या भव्य मोर्चाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या निमित्ताने त्यांनी केलेले आक्रमक भाषण आणि थेट हर्षवर्धन (Harshvardhan Jadhav) यांच्यासह विद्यमान आमदारांना दिलेले आव्हान पाहता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्या मोठ्या ताकदीने उतरणार हे स्पष्ट झाले आहे.

Harshvardhan Jadhav-Sanjana News, Aurangabad
Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंना इकडे आड तिकडे विहीर; आता मशाली'वरुन समता पक्ष आक्रमक

आमच्या घरात दहा वर्षे जी आमदारकी होती, त्याची खरी हिरो मीच होते, असे सांगत संजना यांनी हर्षवर्धन यांच्या आमदरकीचे श्रेय आपलेच असल्याचे ठणकावून सांगितले. (Kannad) मंत्र्यांची मुलगी, विधानसभा लढवायची ही माझ्यावर टीका होत असली तरी मला पदाची लालसा नाही, मी संयमी आहे, पण आता माझ्या संयमाचा कुणी अंत पाहू नये, (Bjp) असा थेट इशारा देखील संजना यांनी आपल्या विरोधकांना दिला.

महिनाभरापुर्वी सोयगांव येथील एका मेळाव्यात संजना जाधव यांनी कन्नड-सोयगांव मतदारसंघातून विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर कन्नड तहसिल कार्यालयावर काढलेल्या मोर्चानंतर यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. शेतकरी, सर्वसामान्यांच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला उद्देशून केलेल्या भाषणात संजना यांनी चांगलीच फटकेबाजी केली.

विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत यांच्यावर टीका करतांना मुंबईत फ्लॅट पाहिजे म्हणून बोलणारे लोकप्रतिनिधी शेतकरी, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर मात्र विधानसभेत गप्प बसतात? असा टोला लगावला. जनता आता माझ्या पाठीशी आहे, असे सांगत त्यांनी विरोधकांना इशारा दिला. एकंदरित कन्नड-सोयगांव मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत राजपूत-संजना- हर्षवर्धन असा तिरंगी सामना रंगण्याची शक्यता आहे. संजना यांनी पहिल्याच मोर्चा शक्तीप्रदर्शन करत विरोधकांना सूचक इशारा दिल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com