Sanjay Shirsat On Sanjay Raut : पवार कुटुंबामध्ये कहल निर्माण करणाऱ्या राऊतला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जोड्याने मारतील..

Shivsena : राष्ट्रवादी फोडण्यात संजय राऊत यांचा निश्चितच हात आहे.
Mla Sanjay Shirsat-Mp Sanjay  Raut News
Mla Sanjay Shirsat-Mp Sanjay Raut NewsSarkarnama

Maharashtra : राष्ट्रवादी पक्षात आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कुटुंबात कलह निर्माण करण्याचे काम संजय राऊत करत आहे. राष्ट्रवादी फोडण्यात देखील त्यांचा हात आहे, त्यामुळे उद्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संजय राऊतला रसत्यावर जोडे मारतील, असा इशारा शिवसेना (शिंदेगट) प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिला आहे.

Mla Sanjay Shirsat-Mp Sanjay  Raut News
Protest For Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी केंद्र आणि राज्य सरकारची इच्छा नाही...

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होत आहोत, अशी घोषणा त्यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात केली. त्यानंतर राज्यात एकच भूकंप झाला. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा, यासाठी (Ncp) राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांची मनधरणी करत आहेत. कुणी रक्ताने पत्र लिहत आहे, तर कुणी उपोषणाला बसले आहे.

या सगळ्या घडामोडींवर शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांच्यामुळेच राष्ट्रवादीत कलह निर्माण झाल्याचा आरोप शिरसाट यांनी केला. शिरसाट म्हणाले, राष्ट्रवादी फोडण्यात संजय राऊत (Sanjay Raut) यांचा निश्चितच हात आहे. आतापर्यंत त्यांनी कुटुंबांमध्ये भांडणे लावणे, कलह निर्माण करणे हेच काम केले आहे.

आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी जो अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, किंवा त्यांनी या जबाबदारीतून मुक्त होण्याचे ठरवले आहे, या मागे संजय राऊत हेच आहेत. पवार कुटुंबांमध्ये कलह निर्माण करून त्यांनी हा पक्ष देखील फोडला आहे. पण यासगळ्याकडे राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता बारकाईने पाहतो आहे, तो संजय राऊत यांना रस्त्यावर उतरून जोडे मारल्याशिवाय राहणार नाही, याचा पुनरुच्चार देखील शिरसाट यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com