Sanjay Shirsat : तोंडावर साहेब म्हणणारे राऊत, उद्धवला काय कळते असं म्हणायचे..

Shivsena : जे स्वतःला किचन कॅबिनेटमधले सदस्य समजतात ते मात्र तोंडावर एक आणि बाहेर मात्र उलटसुलट बोलतात.
 Uddhav Thackeray -Sanjay Shirsat News, Aurangabad
Uddhav Thackeray -Sanjay Shirsat News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad : जसजसा मंत्रीमंडळविस्तार जवळ येवू लागला आहे, तसा शिंदेगटाचे आमदार संजय शिरसाट उद्धवसेनेच्या संजय राऊतांवर हल्ला चढवत आहेत. (Aurangabad) औरंगाबादेत मंत्रीमंडळ विस्ताराच्या मुहूर्ताची तारीख सांगितल्यांवर भाजपे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या विधानाचा दाखला देत शिरसाटांनीही राऊतांवर गंभीर आरोप केले. तोंडावर उद्धव ठाकरेंना साहेब म्हणणारे राऊत, उद्धवला काय कळते असं अनेकदा बोलल्याचा दावा केला आहे.

 Uddhav Thackeray -Sanjay Shirsat News, Aurangabad
Ashok Chavan : महापुरूषांच्या नावाने वाद निर्माण करुन विकास कामांवर वरवंटा फिरवला जातोय..

नारायण राणे यांनी केलेल्या आरोपात सत्यता असू शकते, ते उद्धव ठाकरेंना राऊत रश्मी ठाकरे आणि त्यांच्याबद्दल काय बोलले हे नक्की सांगतील असेही (Sanjay Shirsat) शिरसाट म्हणाले. संजय राऊत राज्यसभेत माझ्या बाजूला बसून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि रश्मी ठाकरेंबद्दल काय बोलत होता, हे मी उद्ध ठाकरेंना जावून सांगितले तर ते राऊतला चपलेने मारतील, असा खळबळजनक दावा केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केला.

यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना विचारले तेव्हा, उद्धवला काय कळते, अस राऊत अनेकदा, अनेक ठिकाणी बोलले असल्याचा दावा केला. संजय शिरसाट म्हणाले, आमचा रश्मी ठाकरेंशी फारसा संबंध येत नव्हता, मातोश्रीवर गेलो की फक्त वहिनी काय चालले? एवढेच आमचे संभाषण व्हायचे.

पण जे स्वतःला किचन कॅबिनेटमधले सदस्य समजतात ते मात्र तोंडावर एक आणि बाहेर मात्र उलटसुलट बोलतात. संजय राऊत हे अनेकदा उद्धवला काय कळते? असे म्हटलेले आहे. त्यामुळे राणे यांनी जे सांगितले ते सत्य असले आणि ते उद्धव ठाकरेंना देखील सांगू शकतात. राणे-राऊत हे मित्र आहेत, आता दोन मित्रांमध्ये काय गप्पा होत असतील याचा तुम्हीच विचार करा, मी त्यावर अधिक बोलू शकत नाही, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com