MLA Sanjay Shirsat News : संजय शिरसाट म्हणतात, मनोज जरांगेंच्या भुमिकेनंतरच निवडणुकीत खरी रंगत..

Sanjay Shirsat says, the picture of assembly elections will be clear only after the role of Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांना भडकावण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते सातत्याने करत असल्याचा आरोपही शिरसाट यांनी केला.
MLA Sanjay Shirsat-Manoj Jarange Patil News
MLA Sanjay Shirsat-Manoj Jarange Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे `फॅक्टर`मुळे `फॅक्चर` झालेल्या महायुतीने विधानसभा निवडणुकीतही त्यांचा चांगलाच धसका घेतला आहे. महायुती-महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या याद्या तयार असूनही अद्याप एकाही पक्षाने त्या जाहीर केलेल्या नाहीत. त्यामागचे कारण म्हणजे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सगळ्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. येत्या 20 तारखेला मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करायचे की पाडायचे? याचा निर्णय घेणार आहेत.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार तथा राज्य प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी महत्वाचे विधान केले आहे. `सकाळ`च्या `थेट-भेट` शिरसाट यांनी स्पष्टच सांगितले की, जोपर्यंत मनोज जरांगे पाटील आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत, तो पर्यंत विधानसभा निवडुकीत रंगत येणार नाही. महायुतीने मराठा आरक्षणावर आपली भूमिका वारंवार स्पष्ट केली आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिले जावे, यावर आजही आम्ही ठाम आहोत.

महायुतीच्या काही नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला समर्थनाची भूमिका घेतली असली तरी ती त्यांची वैयक्तिक असेल ती महायुतीची भूमिका नाही, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगे यांना भडकावण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते सातत्याने करत असल्याचा आरोपही शिरसाट यांनी केला. विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटपाची प्रक्रिया सुरू असतांना होणारे पक्षांतर ही प्रत्येक पक्षासाठी चिंतेची बाब आहे.

MLA Sanjay Shirsat-Manoj Jarange Patil News
Sanjay Shirsat Video: जयंत पाटलांना महत्त्वाची जबाबदारी देण्याचे शरद पवारांचे संकेत, शिंदे गटाच्या नेत्याला वेगळीच भीती

अशा पक्षांतरामुळे निष्ठावंतावर मात्र अन्याय होतो, आम्ही फक्त संतरंज्या उचलायच्या का? अशी त्यांची भावना होते. याचा फटका काही प्रमाणात सगळ्याच पक्षांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमच्यासाठी ही निवडणूक खूप महत्वाची आहे. (Manoj Jarange Patil) अडिच वर्षांपुर्वी आम्ही जो उठाव केला, त्यानंतर लोकसभा लढलो. त्यात आमचा स्ट्राईकरेट चांगला राहिला असला तरी काहीप्रमाण गोंधळ झाला. त्या चुका पुन्हा होणार नाही. मायक्रो प्लॅनिंग करून गांभिर्याने आम्ही निवडणूकीला सामोरे जातोय.

एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे कॉमन मॅन म्हटल्या जातेय. त्यांचा चेहरा घेवून त्यांच्या नेतृत्वात ही महायुतीची निवडणूक लढली जात आहे, असे शिरसाट म्हणाले. आम्ही त्यागमुर्तीच आहोत, आम्ही आधी आहूती टाकली, असा टोला शिरसाट यांनी `त्याग` करा, असा सल्ला देणाऱ्या भाजपला लगावला. शिवसेनेतून बाहेर पडून हे सर्वघडवून आणणे सोपे नव्हते. मातोश्रीची निष्ठावान आणि गद्दारीची व्याख्या आता बदलली आहे. इतर पक्षात गद्दारी करून आलेल्याला लगेच `एबी` फार्म देण्याची, निष्ठावान करण्याची नवी वाॅशिंग मशीन त्यांच्याकडे आली आहे, असा चिमटा शिरसाट यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लगावला.

MLA Sanjay Shirsat-Manoj Jarange Patil News
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील निवडणूक लढण्याच्या तयारीत? म्हणाले, 'कागदपत्र तयार ठेवा...'; उद्याच इच्छुक उमेदवारांशी चर्चा

मराठा समाजासाठी लढणारा एक फाटका माणूस पुढे आला. प्रस्थापित पुढाऱ्यांचे नेतृत्व त्याने संपवले त्यामुळे शरद पवारांपासून अनेक नेत्यांना जरांगे पाटील `फॅक्टर` ची पोटदुखी सुरू आहे. एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतात, याची जाणीव जरांगे पाटील यांना आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यावर ते ठाम आहेत, असेही शिरसाट यांनी सांगितले. चार वेळा मुख्यमंत्री होऊन पवारांनी मराठा आरक्षणावर निर्णय घेतला नाही. अडीच वर्ष सत्तेत होते तेव्हा काही केले नाही. आता ते आम्हाला सल्ले देत आहेत. ते या मुद्द्यापासून पळ काढून राजकारण करत असल्याचा आरोपही शिरसाट यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com