Uddhav Thackeray News, Sanjay Shirsat News, Aurangabad
Uddhav Thackeray News, Sanjay Shirsat News, AurangabadSarkarnama

Sanjay Shirsat : प्रकृती बरी नसतांना उद्धव ठाकरेंना बोलवायला नको होते..

आम्हाला दिलासा दिला असता तर हे रामायण घडलेच नसते, असा टोला देखील शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. (Sanjay Shirsat)

औरंगाबाद : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आपल्याच शहरातले आहेत, असे असतांना आणि उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसतांना त्यांना का बोलावले? हा खरा प्रश्न आहे. बरं त्यांनी येऊन १५ मिनिटात शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी केली हे देखील आश्चर्यच म्हणावे लागेल, असा टोला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरेंच्या कालच्या दौऱ्यावरून लगावला. या दौऱ्याने शेतकऱ्यांना खरचं दिलासा मिळणार आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थितीत केला.

 Uddhav Thackeray News, Sanjay Shirsat News, Aurangabad
Marathwada : तुम्ही मदत जाहीर करा, आम्ही दौरे बंद करतो; उद्धवसेनेचे सरकारला आव्हान..

ह्दयविकाराचा झटका आल्यानंतर अॅन्जोओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाल्यानंतर आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आज शहरात परतले. मुंबईच्या लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. (Uddhav Thackeray) मनुष्याच्या आयुष्यात सकंटं येत असतात, पण या निमित्ताने मला एक अनुभव आला, तो म्हणजे तुमचे काम चांगले असेल तर लोक तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात.

मी लिलावतीत असतांना अनेकांनी प्रत्यक्ष येवून तर हजारो लोकांनी फोनवरून माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. हे प्रेम खूप कमी लोकांच्या नशिबी येते. उद्धव ठाकरे यांचा कालचा १५ मिनिटांचा दौरा आश्चर्यचकित करणारा होता. यातून शेतकऱ्यांना खरचं दिलासा मिळेल का? हा खरा प्रश्न आहे. बरं उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसतांना त्यांना का बोलावले असले?

विरोधी पक्षनेते शहरातच असतात, मग त्यांना बोलावून त्रास देण्यात काय अर्थ होता. त्यांना कोणी बोलावले का? हे देखील तपासले पाहिजे. या दौऱ्याने खरचं शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का? की केवळ येवून भाषण करायचे आणि टाळ्या मिळवायच्या एवढाच या दौऱ्याचा हेतू होता, अशी टीका देखील शिरसाट यांनी केली. आम्हाला दिलासा दिला असता तर हे रामायण घडलेच नसते, असा टोला देखील शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com