Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना तिळगुळ द्यायला आवडेल..

Marathwada : मध्यंतरी ते पुन्हा ठाकरे गटात येणार अशा वावड्या देखील उठवण्यात आल्या होत्या.
Uddhav Thackeray -Sanjay Shirsat News, Aurangabad
Uddhav Thackeray -Sanjay Shirsat News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Shivsena : शिंदे बंडात आघाडीवर असलेले आणि थेट उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून जाब विचारणारे आमदार संजय शिरसाट यांचे ठाकरे प्रेम अचानक समोर आले आहे. मकरसंक्रातीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना तिळगुळ द्यायला आपल्याला आवडेल, असे म्हणत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. राजकारणात कायम कोणी कोणाचा शत्रू नसतो, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

Uddhav Thackeray -Sanjay Shirsat News, Aurangabad
Ashok Chavan : तांबे प्रकरणाची माहिती थोरातांना असेल, त्यांच्या घरातला विषय आहे..

औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) हे शिंदे बंडात आघाडीवर होते. एकनाथ शिंदे ४० आमदारांसह जेव्हा सुरतला गेले, तेव्हा उद्धव ठाकरे, (Shivsena) शिवसेनेकडून होणाऱ्या टीकेला सर्वप्रथम जाहीर पत्र लिहून शिरसाटांनीच प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर सातत्याने शिरसाट ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेबद्दल टीका करण्यात आघाडीवर राहिले.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाने हुलकावणी दिल्यावरही शिरसाटांची ठाकरे विरोधातील धार काही कमी झालेली नाही. अगदी १७ तारखेच्या निवडणुक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गटात कोणीच शिल्लक राहणार नाही, असे विधान शिरसाट यांनी नुकतेच केले होते. त्यावर मकरसंक्रांतीच्या निमित्ताने थेट उद्धव ठाकरे यांना तिळगुळ द्यायला आपल्याला आवडेल या त्यांच्या इच्छेने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.

संजय शिरसाट मंत्रीपद न मिळाल्यामुळे मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याच्या चर्चा अधूनमधून होत असतात. यावर वैतागून शिरसाटांनी एकदा प्रसार माध्यमांना मला न विचारता नाराजीच्या बातम्या दिल्या तर कोर्टात खेचीन, असा इशारा देखील दिला होता.

मध्यंतरी ते पुन्हा ठाकरे गटात येणार अशा वावड्या देखील उठवण्यात आल्या होत्या. परंतु आपण शिंदेसाहेबांसोबतच राहणार असल्याचे त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले. त्यामुळे शिरसाटांना उद्धव ठाकरे यांना तिळगुळ द्यावेसे का वाटतात? असा प्रश्न उपस्थीत केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com