Latur MNS News : मराठवाड्यात मनसेचा पहिला उमेदवार जाहीर.. संतोष नागरगोजे लातूर ग्रामीणमधून मैदानात..

Santhosh Nagargoje is nominated from MNS in Latur Rural Constituency : शेतकरी, कामगार, विद्यार्थी, अवैध धंदे अशा विविध प्रश्नांवर आंदोलन करत त्यांनी जिल्ह्यात मनसेची ताकद वाढवली आहे. दुष्काळ, अतिवृष्टी अशा नैसर्गीक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात मनसेचा नेहमी पुढाकार असतो.
MNS Santosh Nagargoje Latur
MNS Santosh Nagargoje LaturSarkarnama
Published on
Updated on

MNS News Latur : मराठवाडा दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी लातूर ग्रामीणमधून मनसेचे सरचिटणीस संतोष नागरगोजे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मराठवाड्यातील मनसेचे ते पहिले उमेदवार ठरले आहेत. धाराशिवचा दौरा संपल्यानंतर राज ठाकरे आज लातूर दौऱ्यावर आहेत. पदाधिकारी,कार्यकर्त्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी संतोष नागरगोजे यांची लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली.

या उमेदवारीचे मनसेच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले, तर संतोष नागरगोजे यांनी उमेदवारी देऊन राज ठाकरेंनी माझ्यावर आणि लातूर जिल्ह्यातील मनसैनिकांवर जो विश्वास दाखवला त्याबद्दल आभार व्यक्त केले. (Raj Thackeray) राज्यात सव्वादोनशेहून अधिक विधानसभेच्या जागा मनसे स्वबळावर लढवणार आहे. याची तयारी म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत.

पंढरपूर- मुंबईतील शिवडी विधानसभेसाठी अनुक्रमे दिलीप धोत्रे, बाळा नांदगावकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर मराठवाड्यात मनसे पहिली उमेदवारी कोणाला देणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. लातूर जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर आजच्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी लातूर ग्रामीणसाठी नागरगोजे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. संतोष नागरगोजे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस तथा शेतकरी सेनेचे अध्यक्ष आहेत.

MNS Santosh Nagargoje Latur
MNS On Bangladesh Violence ...तर बांगलादेशींना शोधून ठोकणार; हिंदूंवरील अत्याचारावरून मनसे आक्रमक

लातूर (Latur) जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून नागरगोजे मनसेचे काम करत आहेत. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, अवैध धंदे अशा विविध प्रश्नांवर आंदोलन करत त्यांनी जिल्ह्यात मनसेची ताकद वाढवली आहे. दुष्काळ, अतिवृष्टी अशा नैसर्गीक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात मनसेचा नेहमी पुढाकार असतो.

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असा प्रमुख पक्षांच्या यादीत गेल्या काही वर्षापासून आता मनसेचे नाव घेतले जाते. संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात मनसेची संघटनात्मक बांधणी करण्यात स्थानिक नेत्यांना यश आल्याचे दिसून आले आहे. लातूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत उमेदवार देण्यासंदर्भात पक्षाच्या वतीने निरीक्षक पाठवण्यात आले होते. या निरीक्षकांनी संतोष नागरगोजे यांच्या नावाला पसंती दर्शवली होती.

MNS Santosh Nagargoje Latur
Raj Thackeray News : राज ठाकरेंनी धाराशिव दौरा घेतला आटोपता; तासाभरातच चार मतदारसंघाच्या बैठका संपवल्या

आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नागरगोजे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. काँग्रेस महाविकास आघाडीचे लातूर ग्रामणीचे विद्यमान आमदार धीरज देशमुख यांची उमेदवारी कायम गृहित धरता मनसेचे संतोष नागरगोजे यांचा त्यांच्याशी सामना होणार आहे. महाविकास आघाडी-महायुतीमध्ये मनसेच्या उमेदवारामुळे चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या तरी लातूर ग्रामीण मतदारसंघात तिरंगी लढत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

मनसेकडे जिल्ह्यात तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात वळलेला आहे. राज ठाकरे यांच्या लातूर दौऱ्यात त्यांच्या स्वागतासाठी उसळलेली गर्दी, काढण्यात आलेली वाहन रॅली यामुळे जिल्ह्यात मनसेमय वातावरण निर्माण झाले आहे. लातूर ग्रामीणमध्ये मनसेने उमेदवार जाहीर केल्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून येणाऱ्या काळात ते झपाट्याने कामाला लागण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्या स्वबळामुळे महायुती प्रमाणेच महाविकास आघाडीचीही डोकेदुखी वाढणार, एवढे मात्र नक्की.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com