Bhokardan Assembly Election : संतोष दानवेंचा जत्रेत फेरफटका, दर्शन अन् जिलेबी-भज्यावर ताव

Santosh Danve Election Campaign : भोकरदनमध्ये संतोष दानवेंचा झंझावाती प्रचार
Santosh Danve Election Campaign
Santosh Danve Election Campaign
Published on
Updated on

भोकरदन : महायुती सरकारच्या काळात ग्रामीण भागात झालेले रस्ते व विजेच्या माध्यमातून स्वयंपूर्ण झालेली गावे यामुळे गावागावात भरणाऱ्या जत्रा आकर्षणाचे केंद्र बनत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने मजबूत होत आहे व ग्रामीण महाराष्ट्राला व यात्रेकरूंना अध्यात्मा सोबत विकासाची जोड या सरकारने दिल्याचे, आमदार संतोष दानवे म्हणाले.

भोकरदन तालुक्यातील नळणी खुर्द येथील समर्थ काळू महाराजांच्या यात्रेत हजेरी लावत असताना ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले. प्रचारासाठी उमेदवारांची मोठी धावपळ सुरू आहे सकाळी सहा पासून सुरू झालेले उमेदवारांचे प्रचार दौरे रात्री बारापर्यंत सुरु आहेत.

या धावपळीच्या दिवसात उमेदवार मिळेल त्या ठिकाणी व जिथे वेळ मिळेल तिथे देवदर्शन पूजा करताना दिसत आहेत. दररोज आठ ते दहा गावांमध्ये प्रचार दौऱ्याचे नियोजन असताना भोकरदन चे महायुतीचे उमेदवार संतोष दानवे यांनी दरवर्षी परंपरेप्रमाणे भोकरदन तालुक्यातील नळणी खु. येथील परमपूज्य समर्थ काळू महाराज यांच्या यात्रेत सहभाग नोंदवला.

महोत्सवानिमित्त पालखी व मिरवणुकीस उपस्थित राहून दानवे यांनी मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. चंद्रकांत साबळे व त्यांच्या मित्र मंडळाच्या काळातील जुने सहकारी गजानन वराडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षापासून संतोष दानवे या यात्रेला नेहमी हजेरी लावतात. यात्रेत आलेल्या परिसरातील ग्रामस्थांशी संवाद साधतात. येथील दुकानदारांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेतात. यंदा विधानसभा निवडणुकीची धावपळ असताना देखील त्यांनी रात्री उशिरा जत्रेत हजेरी लावली. एवढेच नाही तर जत्रेतील जिलेबी-भजे वर ताव मारला. सोबत प्रचारासाठी निघताना चिवडा आणि रेवड्याही घेतल्या.

यंदा वरूण राजाच्या कृपेमुळे मतदार संघातील पाण्याची परिस्थिती चांगली असून जत्रेमध्ये उत्साह जाणवल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित शेतकरी युवकांनी महायुती सरकारच्या योजनांचा झालेला लाभ याविषयी देखील चर्चा केली. डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून दुकानदारांना त्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा होत आहेत. शिवाय दहा वर्षात मतदार संघात झालेले राष्ट्रीय महामार्ग, ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी झालेले रस्ते यामुळे जत्रेत येणाऱ्या लोकांना सुविधा निर्माण झाली आहे.

ग्रामीण जत्रा हे मराठवाड्याच्या ग्रामीण संस्कृतीचा कणा आहे. महायुती सरकारने तीर्थक्षेत्रांना विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला असून मतदार संघातील प्रत्येक ग्रामीण भागात मंदिरांसमोर झालेले सभागृह आज गावकऱ्यांसाठी विरंगुळ्याचे व विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांसाठीचे उपयुक्त केंद्र ठरत असल्याचे दानवे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com