Manoj Jarange: परळीत क्लीप व्हायरल! जरांगेंचा फडणवीस सरकारला इशारा; वाल्मीक कराड सुटला तर...

One Year of Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: सरकार पक्षात अजितदादांचा एक आमदार आहे, त्यांनी एक टायर पंक्चर केलेलं आहे, तोच या प्रकरणात यंत्रणा चालवत आहे, असा आरोप करत जरांगे पाटील यांनी पुन्हा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.
One Year of Sarpanch Santosh Deshmukh Murder Case
One Year of Sarpanch Santosh Deshmukh Murder CaseSarkarnama
Published on
Updated on

Santosh Deshmukh Murder Case: 'वाल्मीक अण्णांची बेल होणार, सगळं पहिल्या सारख सुरळीत होणार' अशी परळीतील धर्माधिकारी आणि मस्के यांच्यातील कथित आॅडिओ क्लीप सोशल मिडियावर व्हायरल झाली. यावरून राज्याच्या राजकारणात पुन्हा गदारोळ सुरू झाला.

विशेष म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला एक वर्ष पुर्ण होत असतांना हे सगळं घडतंय. याच मुद्यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोग येथून राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला.

संतोष भैय्या देशमुख हत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटला, तर बीड जिल्हा आणि त्यानंतर संपूर्ण राज्य बंद करू. परळीवाला मुद्दाम त्याच्या लोकांकडून तो सुटणार आहे, अशा गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. पण तो (वाल्मीक कराड) सुटला तर राज्यात एकही चाक चालणार नाही, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वेळी व्हिडिओ कॉल करणारा कृष्णा आंधळे अजून का सापडत नाही? तो सापडला तर सगळं समोर येईल, असेही जरांगे पाटील म्हणाले.

संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोगमध्ये जाऊन पीडित देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. या प्रकरणात निकाल येण्यासाठी वर्ष उजडणार नाही, असं वाटलं होतं, त्याच्या वल्गना मुख्यमंत्र्यांकडून झाल्या होत्या. एक वर्षाच्या आत या प्रकरणातील आरोपींना फासवर लटकू असा शब्द दिला होता. मात्र, या प्रकरणात दिरंगाई होत आहे. सरकार पक्षात अजितदादांचा एक आमदार आहे, त्यांनी एक टायर पंक्चर केलेलं आहे, तोच या प्रकरणात यंत्रणा चालवत आहे, असा आरोप करत जरांगे पाटील यांनी पुन्हा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

संतोष देशमुख यांच्या प्रकरणात आम्ही एक आहोत, एका लेकीला आणि एका लेकाला आपला बाप दिसत नाही. आरोपी फासावर गेल्याशिवाय आमचं समाधान होणार नाही. परळीवाल्यांनी काही माणसं पेरुन ठेवले आहेत, त्यांनी काही माणसाला सांगितलं आहे की, आपला एक माणूस सुटणार असं बोला. हे परळीतल्या लोकांकडून बोलून घेतलं जात आहे, असा दावाही जरांगे यांनी केला. ज्या दिवशी या प्रकरणातील आरोपी सुटेल त्या दिवशी हा जिल्हा पूर्ण बंद ठेवायचा, त्यानंतर राज्य बंद ठेवण्यात येईल, असेही ते म्हणाले.

One Year of Sarpanch Santosh Deshmukh Murder Case
Pune Vote Chori: पुण्यातही वोट चोरी? ठाकरेंच्या वकिलांनी समोर आणलं सीसीटीव्ही फुटेज: सरकारी कार्यालयाला आतून कडी...

परळीवाला असं का घडवून आणतो हे सरकारने शोधलं पाहिजे, सरकार अडचणीत येण्याचे स्टेटमेंट तो का करतो हे बघितलं पाहिजे. मात्र, तू सुटणार नाही हे सत्य आहे, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे. धन्यानीच हा सगळा प्रकार घडून आणला आहे, जोपर्यंत आरोपींना फाशी होत नाही, तोपर्यंत आम्ही कुणीही मागे हटणार नाहीत. ज्या दिवशी तो सुटेल त्या दिवशी राज्यात चाक देखील फिरणार नाही. आधी या प्रकरणाच्या तपासाचा वेग योग्य वाटत होता, फडणवीस यांनी शब्द दिला होता. फडणवीस साहेबांच्या एका शब्दावर सगळे लोक शांत बसले होते. सरकार या प्रकरणात दबाव आणते का हे बघितलं पाहिजे? क्रूर हत्या करणारे बाहेर फिरतात कृष्णा आंधळे कुठे आहे? असा सवालही जरांगे पाटील यांनी केला.

तर अजितदादांचा राग येणारच..

क्रूर हत्या करणारे सापडत नाहीत, तुमच्यासाठी परळीवाला महत्त्वाचा आहे का? आंधळेने मारतानाचे व्हिडिओ कॉल केले आहेत, तो पकडला की या प्रकरणाचा मोठा उलगडा होईल. सरकारने हा विषय चार-पाच महिन्याच्या आत संपवावा.ओबीसीचे नेते कितीतरी आहेत त्यांना मोठे करा, अशा क्रूर लोकांना सांभाळत असाल तर आम्हाला अजित दादाचा राग येणारच. तुम्ही चुकीच्या माणसाला जवळ करत आहात. काल तर तो त्यांना घेऊन गेला, अजित पवार आणि त्याची बैठक झाली. पोलीस महासंचालकाची बैठक झाली, पण विकासाच्या कामात पोलीस महासंचालकाचे काय काम? काहीतरी शिजत आहे, फडणवीस तुम्ही याच्यात सहभागी होऊ नका, असेही जरांगे पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com