Gangapur Assembly Election : "महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि शेतकऱ्यांसाठी गंगापूरमध्ये बदल हवाच"

Satish Chavan election campaign rally : माता-भगिनींच्या सक्षमीकरणासाठी साथ द्या; सतीश चव्हाण
Satish Chavan election campaign rally in Gangapur
Satish Chavan election campaign rally in Gangapur
Published on
Updated on

गंगापूर-खुलताबाद : महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेले सतीश चव्हाण यांनी महिलांसाठी विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी भरीव प्रयत्न केले आहेत. आपल्या माता-भगिनींच्या सक्षमीकरणासाठी त्यांना समर्थन देऊया, असे आवाहन गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या पदयात्रा, प्रचार सभा आणि काॅर्नर बैठकांमधून केले जात आहे.

महिलांसाठी रोजगार निर्मिती, आर्थिक मदत आणि विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन सतीश चव्हाण यांनी महिलांचे सक्षमीकरण साधले आहे. गंगापूर-खुलताबाद भागात महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी शिक्षण आणि युवकांच्या भविष्याबाबत सजग असलेले सतीश चव्हाण गंगापूर-खुलताबादमधील युवकांना नवनवीन शैक्षणिक संधी उपलब्ध करून देत आहेत.

नव्या पिढीसाठी रोजगार संधी आणि शिक्षण साधनांचा वापर यांचा प्रचार करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. गंगापूर-खुलताबादमधील युवकांना नवीन शिक्षण साधने, रोजगार संधी आणि शैक्षणिक सुविधांपर्यंत पोहोचवण्याच्या कार्यात सतीश चव्हाण अग्रभागी आहेत. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना पाठिंबा देऊया, असे आवाहन करण्यात आले आहे.

गंगापूर-खुलताबादच्या मातीशी नाळ जोडलेले सतीश चव्हाण शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडचणीत कायम साथ देतात. ओला दुष्काळ, कर्जबाजारीपणा, बाजारात पडणारे भाव आणि दैनंदिन खर्च यांसारख्या आव्हानांना तोंड देताना शेतकऱ्यांना लागणारी मदत, आधार आणि संजीवनी देणारा एक नेता म्हणून सतीश चव्हाण आज आपल्या सोबत आहेत. आपल्या शेतकऱ्यांसाठी, आपल्या भूमीसाठी आणि आपल्या हक्कांसाठी या निवडणुकीत सतीश चव्हाण यांना पुन्हा पाठिंबा देऊया, असा निर्धार करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com