Satish Chavan: मराठवाडा पदवीधरमध्ये पहिल्यांदा आमदार झाले, ते दुसऱ्या पंसतीवरच; आता पुन्हा सतीश चव्हाणांपुढे तीच परिस्थिती!

Marathwada Graduate Constituency Result: मराठवाडा पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण यांनी २००८ मध्ये दुसऱ्या पसंतीच्या मतांवर विजय मिळवला होता. २०२६ मध्येही पहिल्या पसंतीचा कोटा कोणालाच गाठता न आल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीकडे लक्ष लागले आहे.
Satish Chavan
Satish ChavanSarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada Graduate Election: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी निर्णायक ठरत आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सतीश चव्हाण यांनी २००८ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवताना दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या जोरावर विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी पहिल्या पसंतीच्या मतांवरच विजय मिळवत आमदारकीची हॅटट्रिक साधली. मात्र, २०२६ च्या निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा कोणत्याही उमेदवाराला पूर्ण करता आलेला नाही. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२००८ मध्ये मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली होती. तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील आणि अजित पवार यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी निर्णायक ठरत आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सतीश चव्हाण यांनी २००८ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवताना दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या जोरावर विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी पहिल्या पसंतीच्या मतांवरच विजय मिळवत आमदारकीची हॅटट्रिक साधली. मात्र, २०२६ च्या निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा कोणत्याही उमेदवाराला पूर्ण करता आलेला नाही. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Satish Chavan
MLC Election Result: विधान परिषद निवडणुकीत भाजपला धक्का! शिक्षक मतदारसंघात पराभव; वाराणसीचा गड सपानं जिंकला

पहिल्या पसंतीचा कोटा महायुती-महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार पूर्ण करू शकले नाही, त्यामुळे दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सध्या सुरू आहे. प्रतापसिंह पाटील यांची पहिल्या पसंतीच्या मतांमधील आघाडी पाहता त्याचा विजय निश्चित मानला जात असला तरी चव्हाण समर्थकांना २००८ च्या निकालाची पुनरावृत्ती होते का? अशी आशा लागून आहे.

२००८ मध्ये त्यांना दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीची मदत घ्यावी लागली होती.सतीश चव्हाण यांनी भाजपचे विद्यमान आमदार श्रीकांत जोशी यांचा पराभव केला होता. मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी केल्यानंतरच त्यांचा विजय निश्चित झाला.त्यांचा विजयाचा फरक ३,४५३ मतांचा होता.

सहा वर्षानंतर २०१४ मध्ये सतीश चव्हाण जेव्हा दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे गेले तेव्हा त्यांनी भाजपचे शिरीष बोराळकर यांचा पराभव केला. पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच त्यांनी आवश्यक कोटा पूर्ण केला होता. चव्हाण यांना पहिल्या पसंतीची ६८,७६५ तर भाजपाच्या शिरीश बोराळकर यांना ५३,६४७ मते मिळाली होती. चव्हाण हे १५,११८ मतांच्या फरकाने विजयी झाले होते.

२०२० च्या तिसरी निवडणूकीत राष्ट्रवादीने सतीश चव्हाण यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. पुन्हा त्यांची लढत भाजपाच्या शिरीष बोराळकर यांच्याशीच झाली. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून चव्हाण यांनी बोराळकर यांच्यावर मोठी आघाडी घेतली होती. सतीश चव्हाण यांनी तब्बल १,१६,६३८ मते घेतली होती. तर शिरीष बोराळकर यांना ५८,७४३ मते मिळाली होती. सतीश चव्हाण हे ५७,८९५ मतांच्या आघाडीने सलग तिसऱ्यांदा विजयी झाले होते. या निवडणुकीत विजयासाठीचा आवश्यक कोटा १,०९,४०९ एवढा होता. आवश्यक कोट्यापेक्षा ७,२२९ अधिक मते मिळाल्याने चव्हाण पहिल्या पसंतीच्या मतांवरच विजयी झाले होते.

Satish Chavan
तुमचे रेशन कार्ड सुरू आहे की बंद? मोबाईलवर घरबसल्या असे तपासा! 10 पाईंटमध्ये जाणून घ्या!

आता २०२६ मध्ये तिसऱ्या टप्प्यातील शेवटची पडताळणी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर एकूण १ लाख ७७ हजार १५० वैध मतांमधून पहिल्या पसंतीमध्ये निवडून येण्यासाठी ८८ हजार ५५८ मतांचा कोटा ठरला आहे. प्रथम पसंतीचे सर्वाधिक मते डॉ.प्रतापसिंह पाटील यांना ७३ हजार ९३१ मिळाली आहेत. तर तर दुसऱ्या क्रमांकाची ६० हजार ७६८ मते मिळाली आहेत. आता दुसऱ्या पसंतीच्या मतांची मतमोजणी पूर्ण होऊन ४१ पैकी खालच्या क्रमाने उमेदवारांना बाद करून त्यांच्या दुसऱ्या क्रमांकाची मते हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com