Satish Chavan : दारुण पराभवानंतर सतीश चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; अजित पवारांची आठवण काढत व्यक्त केला निर्धार

Marathwada Graduate Election: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सतीश चव्हाण यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या. प्रतापसिंह पाटील यांचे अभिनंदन करत त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि पुन्हा उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
Satish Chavan and Ajit Pawar
Satish Chavan and Ajit PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada Graduate Constituency : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला, यात महाविकास आघाडीचे डाॅ. प्रतापसिंह पाटील हे साडेअठरा हजार मतांच्या फरकाने विजयी झाले. तर तीन टर्म या मतदारंसघावर अधिराज्य गाजवलेले महायुतीचे सतीश चव्हाण पराभूत झाले. २७ रोजी सुरू झालेली मतमोजणी २९ ऑक्टोबरच्या पहाटेपर्यंत चालली. यावेळी मतमोजणी केंद्रावर सतीश चव्हाण वगळता सर्व बहुतांश उमेदवारांनी उपस्थिती लावली. पण सतिश चव्हाण तिकडे फिरकले नाही. आज निकाल जाहीर झाल्यानंतर मात्र चव्हाण सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त झाले.

आपल्या फेसबुक पेजवरून त्यांनी नवनिर्वाचित महाविकास आघाडीचे आमदार तथा प्रतिस्पर्धी डाॅ. प्रतापसिंह पाटील यांना विजयी झाल्याबद्दल शुभेच्छा देतांना त्यांचे अभिनंदन केले. तर गेल्या अठरा वर्षात माझ्याकडून काही राहून गेलं असल्यास समजून घ्याल, अशी अपेक्षाही व्यक्त केली. सतीश चव्हाण यांच्यासाठी पराभवाचा हा मोठा धक्का मानला जात आहे. तीन टर्म प्रतिनिधित्व, मतदारांशी थेट संपर्क, प्रभावी प्रचार यंत्रणा हाताशी असताना चव्हाण यांचा झालेला पराभव हा त्यांना व त्यांच्या समर्थकांच्या जिव्हारी लागला आहे.

या पार्श्वभूमीवर सतीश चव्हाण काय प्रतिक्रिया देतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. ते म्हणाले, "निवडणूक म्हणजे लोकमताचा निर्णय आहे, गेली 18 वर्षे मी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महाराष्ट्राच्या विधिमंडळात प्रतिनिधित्व केले. या काळात माझ्याकडून जे करता येईल ते मी केले मात्र लोकांचा निर्णय हा लोकशाहीत अंतिम असतो आणि तो मान्य करीत आपलं लोककार्य पुढे चालू ठेवण्याचा हा माझा निश्चय आहे".

Satish Chavan and Ajit Pawar
Government Schemes : सरकारचा आणखी एका महत्त्वाच्या योजनेला रामराम? 25 कोटींपेक्षा कमी खर्चाच्या योजनांवर कात्री,नेमकं कारण काय?

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेले प्रतापसिंह पाटील यांना विजयाच्या शुभेच्छा देत ते म्हणाले, "मराठवाड्यातील तरुणांच्या अंगात जिद्द आणि विश्वास दोन्हीही आहे. त्यांना शिक्षणानंतर नोकरी आणि उद्योग यासाठी आवश्यक ते पाठबळ मिळावं यासाठी माझे प्रयत्न यापुढेही चालूच राहतील. या अठरा वर्षाच्या कालखंडात मला अनेक विश्वासू सहकारी आणि कार्यकर्त्यांचं पाठबळ मिळालं त्या सर्वांचे आभार मानतो".

Satish Chavan and Ajit Pawar
Abdul Sattar: "मराठवाडा, विदर्भ अन् पुणे विभाग मिळून ७० टक्के महाराष्ट्रानं महायुतीला नाकारलं", असं सांगत अब्दुल सत्तारांनी दिला धोक्याचा इशारा

अजितदादांची शिकवण सांगत नव्या दमाने उभे राहण्याचा निर्धार

पराभवाने खचून न जाता आणि विजयाने हुरळून न जाता पुन्हा नव्या दमाने उभे राहण्याची शिकवण दिवंगत अजितदादांकडून मिळाल्याचे सांगत “ या कालखंडात माझ्याकडून काही राहून गेलं असल्यास आपण समजून घ्याल ही अपेक्षा बाळगतो. पराजयाने खचायचं नाही आणि विजयाने मातायचं नाही, पुन्हा नव्या दमाने उभं राहायचं,” असे सांगत मराठवाड्यातील जनता आणि कार्यकर्त्यांसोबत लोककार्यात सक्रिय राहण्याचा शब्द त्यांनी दिला. सतीश चव्हाण यांनी जनतेचा कौल स्वीकारत पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचाल सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com