Aurangabad District Bank News : सत्तारांनी अध्यक्षपद दिले आणि त्यांनीच काढून घेतले ; नितीन पाटील यांचा राजीनामा..

ADC Bank : दोन ओळीचा राजीनामा लिहून त्यांनी तो बँकेचे व्यवस्थापक अजय मोठे यांच्याकडे पाठवला आहे.
Aurangabad District Bank News
Aurangabad District Bank News Sarkarnama

Marathwada : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कृपेने औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्षपद मिळालेल्या नितीन पाटील यांच्यावर आता त्यांची वक्रदृष्टी झाली आहे. (Aurangabad District Bank News) ज्यांनी अध्यक्षपद दिले, त्यांनीच ते काढून घेतले असा काहीसा प्रकार पाटील यांच्याबाबतीत घडला आहे. अब्दुल सत्तार आणि निम्या संचालक मंडळाने अविश्वास दाखवल्यामुळे अखेर नितीन पाटील यांनी बॅंकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

Aurangabad District Bank News
Danve On Shirsat News : मंत्रीपद न मिळाल्याने माणूस बिथरलाय ; ठाकरेंविरोधात बोलणे हीच त्यांची दुकानदारी..

पाटील यांच्या कार्यशैलीबद्दल मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) व पंधराहून अधिक नाराज संचालकांनी राजीनामा द्या, अन्यथा अविश्वास ठराव आणू, असा इशारा दिला होता. या संदर्भात पत्रही देण्यात आले होते. (Aurangabad) अखेर आज (ता.एक) नितीन पाटील यांनी बँकेचे व्यवस्थापक अजय मोटे यांच्याकडे अध्यक्षपदाचा राजीनामा पाठवला. २०१९ पासून अध्यक्ष असलेल्या नितीन पाटील यांनी स्वतंत्रपणे बॅंकेचा कारभार चालवण्यास सुरवात केल्याने मंत्री अब्दुल सत्तार व संचालक मंडळ त्यांच्यावर कमालीचे नाराज होते.

दरम्यान सोसायटी नोंदणी संदर्भात दोन दिवसापूर्वी संचालक आणि अध्यक्ष नितीन पाटील यांच्यात खडाजंगी झाली होती. (Marathwada) याचवेळी नितीन पाटील हे अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार व संचालकांचे म्हणणे ऐकत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. तेव्हाच सर्वांनी नितीन पाटील यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. राजीनामा न दिल्यास अविश्वासाचा ठराव आणू, अशा इशाराही दिला होता.

सोमवारी नितीन पाटील हे नाशिकच्या दौऱ्यावर होते. शहरात आल्यानंतर आज सकाळी घरूनच त्यांनी राजीनामा पाठवून दिला. दोन ओळीचा राजीनामा लिहून त्यांनी तो बँकेचे व्यवस्थापक अजय मोठे यांच्याकडे पाठवला आहे. या राजीनामा पत्रात आज दिनांक एक ऑगस्ट २०२३ रोजी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली. छत्रपती संभाजीनगर बँकेच्या चेअरमन/ अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, असे नमूद केले आहे. सदरील पत्र हे कार्यकारी संचालक/ उपाध्यक्ष यांना देखील पाठवण्यात आले आहे.

पाटील यांच्या राजीनाम्यासाठी सत्तार यांच्यासह १५ संचालकांनी बँकेचे व्यवस्थापक अजय मोटे यांना पत्र दिले होते. तसेच राजीनामा न दिल्यास पाच ऑगस्टला बैठक घेणार असल्याचे सांगितले होते. सगळे संचालक आपल्याविरोधात गेले असल्याचे लक्षात आल्याने नितीन पाटील यांनी आज अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ते अध्यक्षपदावर नसल्यामुळे त्यांच्याकडील बॅंकेची कार देखील परत घेण्यात आल्याची माहिती आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com