Abdul Sattar Meet Central Minister Dr. Karad News, Aurangabad
Abdul Sattar Meet Central Minister Dr. Karad News, AurangabadSarkarnama

Ajanata Caves : सत्तारांनी केंद्रीय मंत्री डाॅ. कराडांकडे मागितले `५० कोटी`..

Dr.Bhagwat Karad : या संदर्भात नुकतीच मुंबईत सत्तार यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले.
Published on

Abdul Sattar : मतदारसंघातील विकासकामांच्या बाबतीत कृषीमंत्री अब्दुल सत्तार कायम आग्रही असतात. शिंदे सरकारमध्ये सर्वाधिक निधी सिल्लोड-सोयगाव या आपल्या मतदारसंघात खेचून आणण्यात देखील ते यशस्वी झाले आहेत. आता राज्याप्रमाणे केंद्राचा निधी देखील मतदारसंघात आला पाहिजे, यासाठी (Abdul Sattar) सत्तारांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

Abdul Sattar Meet Central Minister Dr. Karad News, Aurangabad
Ambadas Danve : खैरे आमचे नेते, पंकजांच्या नाराजीबद्दल त्यांनाच अधिक माहिती...

जगप्रसिद्ध अंजिठा लेणी या सत्तारांच्या मतदारसंघातच येतात. त्यामुळे इथे येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांना चांगल्या सुविधा देता याव्यात यासाठी सत्तारांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) यांच्याकडे ५० कोटींच्या निधीची मागणी केली आहे. (Marathwada) या संदर्भात नुकतीच मुंबईत सत्तार यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

याशिवाय सिल्लोड मतदार संघातील केंद्राच्या विविध विकास कामांसंदर्भात देखील चर्चा केली. यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भारतसिंग राजपूत त्यांच्यासोबत होते. सत्तार यांनी अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक, भीम पार्कला देखील मंजुरी आणली आहे.

याचे देखील काम लवकरच सुरू होणार आहे. पर्यटकांना अजिंठा लेणीपर्यंत पोहचण्यासाठी रोप वे उभारण्यात यावा, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून होत आहे. आता त्यासाठी केंद्राकडून ५० कोटींचा निधी सत्तार यांच्याकडून मागण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com