State Minister Abdul Sattar
State Minister Abdul SattarSarkarnama

Aurangabad : सत्तार थेट गुवाहाटीतून सिल्लोडला येणार, समर्थकांसमोर भाषणही ठोकणार..

सभेला स्वतः अब्दुल सत्तार हे संबोधित करणार असल्याचे कळवण्यात आले आहे. सत्तार अचानक सिल्लोडला कसे ? असा प्रश्न त्यांच्या समर्थकांसह सगळ्यांनाच पडला आहे. (Abdul Sattar)

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात महत्वाची भूमिका बजावणारे ग्रामविकास व महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे उद्या, सकाळी सिल्लोडला येणार आहेत. त्यांच्या समर्थनार्थ मतदारसंघात वाहन रॅली काढण्यात येणार असून त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे. त्यासाठी अब्दुल सत्तार हे हेलीकाॅप्टरने सिल्लोडला येणार असल्यामुळे पोलिसांनी आवश्यक सुरक्षा पुरवावी, असा अर्ज देखील देण्यात आल्याचे त्यांच्या संपर्क कार्यालयातून कळवण्यात आले आहे.

राज्यात सत्तांतराचा हायहोल्टेज ड्रामा सुरू आहे, बंडखोरांच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज्यातील शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. (Shivsena) अशावेळी खरंच सत्तार आसामच्या गुवाहटीमधून सिल्लोडमध्ये येणार ? की मग आपल्या पाठीशी किती लोक आहेत हे दाखवण्यासाठी केलेली ही खेळी आहे, हे उद्याच स्पष्ट होईल. (Aurangabad)

विधान परिषदेची निवडणूक होऊन मतमोजणी झाल्यापासून एकनाथ शिंदे व त्यांच्यासह शिवसेना व अपक्ष असे पन्नासहून अधिक आमदार सुरत मार्गे गुवाहाटी येथील हाॅटेलात मुक्कामाला आहेत. शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडून आपला मुक्काम मातोश्रीला हलवला आहे.

पहिल्या दिवशी बंडखोर आणि राज्यातील शिवसैनिकांना भावनिक आवाहन केल्यानंतर आता उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहे. त्यांनी मंत्रीमंडळातील शिवसेनेच्या मंत्र्यांना निलंबित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत अनेक महत्वाचे ठराव करत बंड मोडून काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर दुसरीकडे राज्यात बंडखोर मंत्री व आमदारांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत.

State Minister Abdul Sattar
Bjp : कराड म्हणाले बंडाशी काडीचा संबंध नाही, पण भाजप सत्ता स्थापन करेल..

अशा गरमागरमीमध्ये अचानक शिंदे यांचे विश्वासू असलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे थेट आसाममधून सिल्लोडला येणार असल्याचे सांगितले जाते. सत्तार यांना समर्थन दर्शवण्यासाठी शहरातून वाहन रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीनंतर जाहीर सभेचे आयोजन देखील करण्यात आले असून या सभेला स्वतः अब्दुल सत्तार हे संबोधित करणार असल्याचे कळवण्यात आले आहे. सत्तार अचानक सिल्लोडला कसे ? असा प्रश्न त्यांच्या समर्थकांसह सगळ्यांनाच पडला आहे.

सत्तार यांच्या संपर्क कार्यालातून कळवण्यात आल्यानूसार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थनार्थ सिल्लोड येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सत्तार यांना समर्थन देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देविदास पाटील लोखंडे यांनी केले असून उद्या, रविवार ( ता.२६ ) रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर सत्तार यांच्या संपर्क कार्यालयापासून रॅलीला सुरुवात होणार आहे.

कार्यालय ते प्रियदर्शनी चौक अशी ही रॅली काढण्यात येणार असून तिथेच सभा घेण्यात येणार आहे. महाराणा प्रताप चौका जवळील मैदानात अब्दुल सत्तार यांचे हेलिकॉप्टरने आगमन होणार असून ते उपस्थितांना संबोधित करणार आहेत. तत्तपुर्वी सत्तार संपर्क कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटी देखील घेणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com