औरंगाबाद : शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भूमिकेमुळे शिवसेनेत मोठे खिंडार पडले आहे. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक विरुद्ध शिंदे गटातील शिवसैनिक असे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. यातच अनेक निष्ठावंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवून सोबत असल्याची ग्वाही देत आहेत. यात (Aurangabad)औरंगाबादच्या फैज खान या तरुणाने या संकटाच्या काळात पक्षप्रमुखांना पाठिंबा दिला आहे.
माझी निष्ठा, माझे उद्धव साहेब असे रक्ताने लिहिलेले पत्र थेट मुंबई गाठून त्याने ठाकरे यांना दिले. वाढदिवसाच्या एवढ्या गर्दीतही वेळ देत `मी तुझ्या निष्ठेचा आदर करतो, निष्ठेने काम करीत रहा`, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी फैजचे कौतुक केले. हर्सूल येथील (Shivsena) शिवसेना शाखाप्रमुख म्हणून फैज खान हा गेल्या दोन वर्षांपासून काम करीत आहे.
शिंदे गटातील बंडखोरी वाढत असून एक-एक खासदार, आमदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडून जात आहेत. दुसरीकडे शिंदे गटातील पदाधिकारी हे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करीत आहेत. या गोंधळाच्या स्थितीत निष्ठावंत शिवसैनिक गोंधळात पडला आहे. राज्यभरातील निष्ठावंत शिवसैनिक शपथपत्र लिहून उद्धव ठाकरे सोबतच असल्याचे सांगत आहेत.
फैज यानेही आजचा मुहूर्त साधत रक्ताने पत्र लिहले. हे पत्र घेऊन फैज आणि त्यांच्या मित्रांनी थेट ‘मातोश्री गाठली. ‘आम्ही तुमच्या सोबत आहोत. माझी निष्ठा, माझे उद्धव साहेब, आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत’असा मजकूर या पत्रात लिहिला आहे. एवढ्या गर्दीतही फैज याला उद्धव ठाकरे यांनी वेळ देत निष्ठेने काम करीत रहा, असा सल्ला दिला. यामुळे नवी ऊर्जा मिळाल्याची प्रतिक्रिया फैज खान यांनी दिली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.