Shaktipeeth highway survey Parbhani : 'शक्तीपीठ'साठी आले, पोटभर जेवण करून गेले; परभणीत मोजणी अधिकाऱ्यांसोबत नेमकं काय घडलं?

Parbhani Saikheda Farmers Host Shaktipeeth Expressway Highway Survey Officers : शक्तीपीठ महामार्गासाठी मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना परभणीमधील सायखेडा गावातील शेतकऱ्यांनी आदरातिथ्य करत जेवू घातलं आहे.
Shaktipeeth highway survey Parbhani
Shaktipeeth highway survey ParbhaniSarkarnama
Published on
Updated on

Parbhani Sonpeth highway Project : भाजप नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट शक्तीपीठ महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रातून शेतकऱ्यांचा जोरदार विरोध होत आहे. विरोधकांनी शेतकऱ्यांना विरोधाला बळ मिळू लागलं आहे. सत्तेत असलेल्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी नेमकं कोणाची बाजू घ्यावी, याचा संभ्रम आहे.

मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना काही ठिकाणांहून शेतकऱ्यांनी पळून लावलं आहे. काही ठिकाणी तीव्र विरोध केला जात आहे. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी हातात दंडूका घेतले आहेत. मात्र परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील सायखेडा गावातील शेतकऱ्यांनी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांचे आदरातिथ्य राजकीय, प्रशासकीय अन् महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला.

परभणीच्या सोनपेठ तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग जात आहे. या महामार्गासाठी शेतकऱ्यांना (Farmers) शेतजमीन देण्यास विरोध आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून शेतकरी या महामार्गाला विरोध करत आहे. शेतकरी शेतजमिनी जात असल्याने आक्रमक आहे. परभणी देखील वेगळं चित्र नाही. परंतु सोनपेठ तालुक्यातील सायखेडा गावातील शेतकऱ्यांनी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यासोबत केलेल्या वर्तनाची, केलेल्या आदरातिथ्याची चर्चा आहे.

सायखेडा इथं जमीन मोजणीसाठी अधिकारी पोलिस (Police) कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. 'तुम्ही आमच्या दारी आला आहात, तर अगोदर जेवण करून घ्या, नंतर बाकीचे काय ते पाहू, असे सांगत शेतकऱ्यांनी मोजणी अधिकाऱ्यांना जेवणाची विनंती केली. गाडीतून उतरल्या उतरल्या शेतकऱ्यांनी थेट जेवणालाच बोलवल्यानं अधिकारी सुरवातीला गोंधळले. शेतकऱ्यांनी आदरपूर्वक आग्रह केला. विनंती केली. त्यानंतर मोजणी अधिकाऱ्यांना विश्वास बसला.

Shaktipeeth highway survey Parbhani
Nilesh Lanke Call Ajit Pawar : शरद पवारांच्या शिलेदाराचा अजितदादांना थेट दिल्लीतून फोन; म्हणाला...

शेतकर्‍यांची आग्रहपूर्वक विनंतीनंतर मोजणी अधिकारी आणि पोलिस कर्मचारी देखील जेवायला बसले. यावेळी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना आग्रहाने पोटभर जेवू घातले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखविल्या. "आमच्या मुलाबाळांच्या पोटचा घास तुम्ही हिरावून घेऊ नका. आमच्या पिढ्यानपिक्या शेतात काम करत आल्या. काळ्या आईचे छत्र हिरावून घेऊ नका, आमच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी महामार्ग आमच्या जमिनीतून घेऊन जाऊ नका, अशी विनंती केली. जमीन मोजणीसाठी आलेले कंपनीचे प्रतिनिधी, महसूल अधिकारी, पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना शांततापूर्वक शेतकऱ्यांनी निवेदन दिलं. सायखेडा गावचे सरपंच, सदस्य आणि स्थानिक शेतकरी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

Shaktipeeth highway survey Parbhani
Yogesh Kadam: कदम कुटुंबाला 'तोडपाणी गँग' म्हणत अनिल परबांचा इशारा; म्हणाले, टप्प्याटप्प्यानं बाहेर...

हिंगोलीत पथकाची गाडी अडवली

हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर (ता. कळमनुरी) डोंगरकडाजवळ 'शक्तीपीठ' महामार्गासाठी जमीन मोजणीस आलेल्या पथकास शेतकऱ्यांनी रोखले. डोंगरकडा, पांचाळ, भाटेगाव, जामगव्हाण, सुकळी इथं जमीन मोजणी होणार होती. हा महामार्ग तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी मंडळ अधिकारी प्रेमदास चव्हाण यांना निवेदन देत करण्यात आली.

तासगावातील शेतकऱ्यांच्या हातात दांडके

शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीतील आज शेतकरी आता हातात दांडके घेऊन रस्त्यावर उतरले. तासगाव तालुक्यातल्या सावळज या ठिकाणी हातात दांडके घेऊन शेतकऱ्यांनी आंदोलन केले. चार दिवसांपासून सावळज इथं शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनीची मोजणी होत आहे. मात्र आक्रमक शेतकऱ्यांकडून मोजणी रोखून धरण्यात आली आहे. शेतात मोजणीला येणाऱ्या अधिकाऱ्यांना बदडून काढण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com