Dharashiv NCp News : पवारांचा नेता अडचणीत; मालमत्तेवर पाच कोटींचा बोजा

Sharad Pawar Ncp Leader Ashok Jagale in Trouble : तुळजापूर तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले...
Ashok Jagdale News
Ashok Jagdale NewsSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv Political News :

उद्योजक तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अशोक जगदाळे यांच्यामुळे गेल्या 10 वर्षांत तुळजापूर तालुक्यातील राजकारण ढवळून काढले आहे. त्यांच्या राजकीय एन्ट्रीमुळे काँग्रेस आणि भाजपला राजकीय हादरे बसू लागले आहेत. तुळजाभवानी कारखान्याची लेव्ही साखर जगदाळेंनी तेरा वर्षांपूर्वी काळ्या बाजारात विक्री केली आणि आता त्याच साखर घोटाळ्यामुळे त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेवर पाच कोटींचा बोजा चढला आहे.

त्यावेळी बळी ठरलेल्या कार्यकारी संचालकांनी आता मला न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, जगदाळेंनी हा राजकीय डाव असल्याचा आरोप केला आहे. Sharad Pawar यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांच्या मालमत्तेवर लेव्ही साखरप्रकरणी चार कोटी 98 लाख 93 हजार 450 रुपयांचा बोजा चढविण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याबाबत पत्रकार परिषद घेऊन श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक विकास भोसले यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या.

Ashok Jagdale News
Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलील यांना MIM अंतर्गतच विरोध; छत्रपती संभाजीनगरमध्ये चाललंय तरी काय?

लेव्ही साखर विक्री प्रकरण

लेव्ही साखर विक्री प्रकरणात आपल्याला नाहक गोवण्यात आल्याचे सांगून आता आपल्याला न्याय मिळणार असल्याचे म्हटले आहे. अशोक जगदाळे यांनी श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर घेऊन 2010-11 व 2011-12 असे दोन हंगाम कारखाना चालविला. दोन वर्षांतील शासनास द्यावयाची लेव्ही साखर काळ्या बाजारात विकून चार कोटी 98 लाख 93 हजार 450 रकमेची जगदाळे यांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे.

यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकार्‍यांनी अशोक जगदाळे यांच्या नळदुर्ग ग्रामीण व अलियाबाद येथील मालमत्तेवर वसुलीकरिता बोजा चढवला आहे. मागील दहा वर्षे आपण गुन्हा न करता वरील साखरेची अफरातफर केली म्हणून आपल्यावर गुन्हा दाखल आहे. मात्र, आता या प्रकरणात खरा गुन्हेगार कोण आहे? हे समोर आले आहे, असा दावा भोसले यांनी केला. यावर लेव्ही साखरेचा विषय हा न्यायप्रविष्ठ आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'सूत्रधाराचा भांडाफोड करणार'

या प्रकरणी आपल्याला कुठल्याही प्रकारची नोटीस न देता किंवा आपल्याला कसल्याही प्रकारची माहिती न देता केवळ राजकीय द्वेषातून आपल्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात आला आहे. या कारवाई विरोधात आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. लेव्ही साखरेचा विषय हा काही कारखान्याचे कामगार, ऊस उत्पादक शेतकरी यांच्याशी निगडित नाही. कारखाना चालवित असताना एक रुपयाचेही देणे कुणाचे ठेवले नाही. मात्र, काही जणांना हे बारा वर्षांपूर्वीचे प्रकरण नाहक उकरून काढण्याची सवय लागली आहे. योग्यवेळी आपण या मागच्या सूत्रधाराचा भांडाफोड करणार असल्याचे अशोक जगदाळे यांनी सांगितले.

R

Ashok Jagdale News
Talathi Exam Fraud : तलाठी भरती परीक्षेत कॉम्प्युटर हॅक करून दिला पेपर ? धक्कादायक माहिती समोर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com