Marathwada : राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये भाकरी फिरवल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे आठवड्याभराने दुसऱ्यांदा मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरात येत आहेत. (Sharad Pawar In Marathwada News) यावेळी त्यांच्यासोबत अजित पवार हे देखील असणार आहेत. येत्या १७ व १८ जून रोजी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शहरात राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने हे दोन्ही नेते शहरात येणार आहेत.
(Ncp) राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या २५ व्या वर्धापनदिनी शरद पवारांनी (Sharad Pawar) महत्वाची घोषणा केली. पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदी प्रफुल पटेल आणि सुप्रिया सुळे यांनी निवड जाहीर केली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा रंगू लागल्या. मात्र शरद पवारांच्या भाषेत भाकरी फिरवल्यानंतर पक्ष जोमाने कामाला लागला आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादीने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
(Ajit Pawar) गेल्या आठवड्यात ७ जून रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत शहरात विविध सामाजिक संघटना, त्यांचे नेते यांची सौहार्द बैठक पार पडली होती. त्यावेळी दोन दिवस पवार शहरात होते. त्यानंतर आता १७ व १८ जून रोजी राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबीराच्या निमित्ताने पुन्हा ते शहरात येत आहेत. शिबिराचे उद्घाटन विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर शिबिराचा समारोप शरद पवार यांच्या उपस्थित होणार आहे. मिटमिटा येथील सिल्वर लॉन्स येथे शनिवारी (ता.१७) दुपारी तीन वाजता शिबिराचे उद्घाटन होईल.
यावेळी माजी मंत्री राजेश टोपे, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, संजय बनसोडे, माजी आमदार अमरसिंह पंडित, प्रकाश गजभिये, बसवराज पाटील, जयसिंगराव गायकवाड, कैलास पाटील, खाजा शरफोद्दीन हे उपस्थित राहणार आहेत. शनिवारी सकाळी १० वाजता पहिल्या सत्रात अमोल मिटकरी, प्रा.एम.आर कांबळे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, डॉ.प्रतिभा अहिरे, जयदेव गायकवाड हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच शिबिराच्या समारोपाला रविवारी शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात रविवारी सकाळी ९ वाजता सुरेंद्र जोंधळे, साहित्यीक डॉ. प्रल्हाद लुलेकर, संजय आवटे, ज्येष्ठ साहित्यीक रावसाहेब कसबे हे मार्गदर्शन करणार आहेत. सध्याची राजकीय व सामाजिक परिस्थिती पाहता, केंद्र व राज्य सरकारच्या वतीने मागासवर्गीय वर्गाच्या विरोधात निर्णय घेण्यात येत आहे, अशा विविध मुद्द्यांवर दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिरात मंथन होणार आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.