शिंदेची खरी शिवसेना आणि आम्ही विधानसभेला दोनशे जागा निवडून आणू..

टीईटी घोटाळ्यात आणखी किती मासे गळाला लागतील? यावर जाळे किती मजबुत आहे, काही मासे भोकशातून निसटून जातात असे म्हणत दानवेंनी अब्दुल सत्तार यांना टोला लगावला. (Raosaheb Danve)
Central Minister Raosaheb Danve-Cm Eknath Shinde News
Central Minister Raosaheb Danve-Cm Eknath Shinde NewsSarkarnama

जालना : संजय शिरसाट आणि कोणीच नाराज नाही, तुम्ही उगाच पाणी घालू नका. शिंदेची खरी शिवसेना आणि भाजपचे राज्यातले सरकार अडीच वर्षाचा काळ पुर्ण करणार आहे. (Jalna) या दरम्यान येणाऱ्या जिल्हा परिषद, महापालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आम्ही लढू आणि जिंकू. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत देखील आम्ही दोघं मिळून दोनशे जागा निवडून आणू, असा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केला.

जालना लोकसभेची जागा (Bjp) भाजपने ९ वेळा जिंकलेली आहे, ही जागा रावसाहेब दानवेच्या बापाची नाही, उद्या मी सोडली तरी पक्ष म्हणेल तुम्ही घरी बसा, आम्ही दुसरा पाहतो, असा टोला देखील दानवे यांनी लगावला. संजय शिरसाट यांचे ट्विट, टीईटी घोटाळ्यात मंत्री अब्दुल सत्तार यांचे आलेले नाव आणि जालना लोकसभा मतदारसंघ खोतकरांना सोडणार का? या प्रश्नावर दानवे यांनी आपल्या खास शैलीत उत्तरे दिली.

दानवे म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार हे पुढील अडीच वर्ष कायम राहील, या सरकारमध्ये कोणीही नाराज नाही, तुम्ही उगाच पाणी घालू नका. एवढंच नाही तर येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये आम्ही एकत्र लढवून सत्ता मिळवू. विधानसभेला देखील शिंदेची खरी शिवसेना आणि भाजप मिळून दोनशे जागा निवडून आणू. टीईटी घोटाळ्यात आणखी किती मासे गळाला लागतील? यावर जाळे किती मजबुत आहे, काही मासे भोकशातून निसटून जातात असे म्हणत दानवेंनी अब्दुल सत्तार यांना टोला लगावला.

अर्जून खोतकरांची ईडीतून सुटका होईल का? यावर आता आमच्यामध्ये कुठलेही वाद राहिलेले नाहीत, आम्ही एकमेकांना साखर भरवली आहे. माझ्या मनात त्यांच्याबद्दल काही आकस नाही. ते माझे मित्र आणि नातेवाईक देखील असल्याचे दानवे म्हणाले. जालना लोकसभेची जागा रावसाहेब दानवेंच्या घरची नाही, इथे मी पाचवेळा, दोनवेळा पुंडलीकराव दानवे, उत्तमसिंह पवार अशी नऊवेळा आम्ही जिंकलेली आहे.

Central Minister Raosaheb Danve-Cm Eknath Shinde News
Shivsena : आम्ही दोघे मिळून गद्दारांना गारद करू; दानवेंनी घेतले खैरेंचे आशिर्वाद..

त्यामुळे लोकसभा सोडण्याचा प्रश्नच नाही, ते माझ्या हातात नाही. जालना लोकसभेची जागा ही भाजपची आहे, उद्या मी जरी सोडली तरी भाजप मला म्हणेल तुम्ही घरी बसा आम्ही दुसरा माणूनस पाहतो, असे सांगत जालना लोकसभेची जागा भाजपकडेच राहील हे स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com