Chandrakant Khaire-Sanjay Shirsat News : संजय शिरसाट यांच्या तिळगुळाचा गोडवा खैरेंना भावला; एकमेकांना नमस्कार, सोबत चहापनाही घेतले!

Khaire Shirsat political meeting Maharashtra : चंद्रकांत खैरे आणि संजय शिरसाट यांची तिळगुळाच्या गोडव्याने झालेली भेट, नमस्कार आणि चहापानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण.
Chandrakant Khaire Sanjay Shirsat News
Chandrakant Khaire- Sanjay Shirsat NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : चंद्रकांत खैरे हे ज्येष्ठ नेते आहेत, शिवसेना वाढवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. मकरसंक्रांतीला आपल्याला त्यांना तीळगुळ द्यायला आवडेल, अशी इच्छा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केली होती. प्रत्यक्षात जरी हा योग आला नसला तरी शिरसाट यांच्या या तीळगुळाचा गोडवा चंद्रकांत खैरे यांना भावला, असे चित्र आज प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या ध्वजवंदन कार्यक्रमात पहायला मिळाले.

यापुर्वी संदीपान भुमरे जेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्री होते, तेव्हा जीपमधून ते अभिवादनाला आले तेव्हा खैरे निघून गेले होते. भुमरे हे गद्दार गटाचे आहेत, ते आमचे पालकमंत्री नाहीत, असा स्वाभिमानी बाणा दाखवत खैरे यांनी त्यांच्याशी हस्तांदोलन टाळले होते. सध्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बाबतीत मात्र खैरे काहीसे मवाळ झाल्याचे पहायला मिळाले.

आजच्या ध्वजवंदन कार्यक्रमात खैरे सहभागी झाले, त्यांनी संजय शिरसाट यांना नमस्कार करत त्याचे अभिवादन स्वीकारत त्यांना हातानेच ख्याली-खुशालीही विचारली. एवढेच नाही तर एकाच सोफ्यावर त्यांच्या शेजारी बसून खैरे यांनी चहापानही घेतले. हे चित्र पाहून संजय शिरसाट यांचा तिळगुळ चंद्रकांत खैरे यांनी स्वीकारला, अशीच चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती.

Chandrakant Khaire Sanjay Shirsat News
Ladki Bahin Yojana : पुरुषांसारखी लाडक्या बहिणींची नावं, सरकार अलर्ट! e-kyc ला मुदतवाढ मिळणार?

शिवसेनेत फूट पडल्यापासून जिल्ह्याच्या राजकारणात गेली पंचवीस-तीस वर्ष एकाच पक्षात काम करणारी नेते मंडळी एकमेकांची कट्टर विरोधक बनली. पक्ष फुटल्याने संदीपान भुमरे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, रमेश बोरणारे अशी मंडळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेली. तर चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे राहिले आणि आपली निष्ठा त्यांनी दाखवून दिली.

लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांना संजय शिरसाट यांनी शिंदेसेनेकडून उमेदवारीची आॅफर दिली होती. परंतु खैरे यांनी मी बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक आहे, मला शिवसेनेने, उद्धव ठाकरेंनी भरभरून दिले, मी तुमच्याकडे कशाला येऊ? मी निष्ठावान शिवसैनिक आहे, असे म्हणत शिरसाट यांची आॅफर धुडकावली होती. लोकसभा निवडणुकीत खैरेंचा पराभव झाला, पक्षातील कट्टर विरोधक असलेल्या अंबादास दानवे यांना अधिक महत्वच दिले जाऊ लागले. तरी खैरे यांचा निर्णय बदलला नाही.

शिरसाट यांना मदत केल्याचा आरोप..

संजय शिरसाट यांनी जेव्हा चंद्रकांत खैरे यांना तिळगुळ देण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा अंबादास दानवे यांनी खैरे यांच्यावर त्यांनी विधानसभा निवडणुकीत शिरसाट यांना मदत केली होती, असा आरोप केला होता. यावर संतापलेल्या खैरे यांनी महापालिका निवडणुकीत अंबादास दानवे शेवटची चार दिवस गायब होता, त्याला पुढच्या भवितव्याचा विचार करायचा असेल, असे म्हणत संशय व्यक्त केला होता.

या पार्श्वभूमीवर आज ध्वजवंदन कार्यक्रमात खैरे-शिरसाट यांची देहबोली बरीच बोलकी होती. खैरे यांच्या अभिवादनाला शिरसाट यांनीही तितक्याच तत्परतेने प्रतिसाद दिला. बराच वेळ शिरसाट- केनेकर- खैरे हे एकाच सोफ्यावर बसून चहापान घेत होते. संजय शिरसाट यांचे सुपुत्र नगरसेवक सिध्दांत शिरसाट यांच्या खांद्याचा आधार घेत खैरे बराच वेळ चालले. एकूणच खैरे यांचा संजय शिरसाट यांच्याबद्दल असलेला राग काहीसा शांत झाल्याचे दिसून आले.

Chandrakant Khaire Sanjay Shirsat News
Latur Politics : कुठयं औसा पॅटर्न? कुठं जातो निधी? मतदारसंघाची श्वेतपत्रिका काढा; अमित देशमुख औशाच्या आमदारावर तुटून पडले!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात खैरे हे एकाकी पडल्याचे चित्र आहे. पक्षात खैरे यांना पुर्वीसारखा मान-सन्मान आता मिळत नाही. अंबादास दानवे यांनी खैरे यांची जागा केव्हाच घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनीही पक्षाची सगळी सुत्रं त्यांच्याच हाती सोपवल्यामुळे खैरे काहीसे नाराज आहेत. पण उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा इतर नेत्यांवर ते कधीही टीका करताना दिसत नाही. राजकारणात कोणी कोणाचा कायम मित्र किंवा शत्रू नसतो हेच खरे. पण शिरसाट यांच्याशी खैरेंची जवळीक वाढली असली तरी त्यांच्या पक्षनिष्ठेवर कोणी शंका घेऊ शकत नाही हे ही तितकेच खरे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com