Shivsena : किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोह, फसवणूक, भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करा..

आयएनएस विक्रांत जहाज वाचविण्यासाठी देशभक्तीच्या नावावर ५८ कोटींचा घोटाळा केला. या कोट्यावधी रूपायांची सखोल चौकशी करा. (Chandrakant Khaire)
Shivsena Complaint Against Bjp Leader Kirit Somiya
Shivsena Complaint Against Bjp Leader Kirit SomiyaSarkarnama

औरंगाबाद : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे किरीट सोमय्या यांनी आयएनएस विराट जहाज वाचवण्यासाठी गोळा केलेल्या ५८ कोटींचा निधी हडप केला, असा आरोप केला होता. (Shivsena) हा देशद्रोह असून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी केली होती.

यासाठी राजभवनातून निधी जमा न झाल्या संदर्भातील पत्राचा हवाला त्यांनी दिला होता. (Kirit Somaiya) त्यानंतर राज्यभरात सोमय्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली असून त्यांच्यावर भ्रष्टाचार, फसवणूक व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन पोलिसांना देण्यात येत आहेत. (Aunrangabad)

औरंगाबादेत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने क्रांतीचौक पोलिस ठाण्यात सोमय्या यांच्याविरोधात निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या हे उठसुठ महाविकास आघाडीच्या नेत्यांवर बेताल आरोप करत आहे.

मात्र त्यांनी आयएनएस विक्रांत जहाज वाचविण्यासाठी देशभक्तीच्या नावावर ५८ कोटींचा घोटाळा केला. या कोट्यावधी रूपायांची सखोल चौकशी करा, सोमय्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Shivsena Complaint Against Bjp Leader Kirit Somiya
Nanded : बिल्डर बियाणी हत्ये प्रकरणी ४५ हिस्ट्रीशीटर गुन्हेगार ताब्यात..

क्रांतीचौक पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक गणपत दराडे यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख आनंद तांदूळवाडीकर, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, ऍड. अशोक पटवर्धन, अनिल जैस्वाल, अखिल शेख, निलेश सेवेकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com