Shivsena : अहो खाला, जरा थांबा! भाजप आमदार श्वेता महालेंना शिवसेनेचा टोला..

सैलानी यात्रेनिमित्त आमदार श्वेता महाले यांनी नुकतीच येथील दर्ग्यावर चादर चढवली. याचे छायाचित्र त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर व्हायरल केले आहेत. (Shivsena)
Shivsena Mla Ambadas Danve
Shivsena Mla Ambadas DanveSarkranama

औरंगाबाद : शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार तथा जिल्हाप्रमुख, प्रवक्ते अंबादास दानवे यांनी दोन दिवसांपुर्वी एमआयएमच्या आघाडीवरील प्रस्तावावर भाष्य करतांना आपल्या फेसबुक पेजवरून एक फोटो व्हायरल केला होता. (Shivsena) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे कानगोष्टी करतांनाच तो मार्मिक आणि प्रासंगिक फोटो होता. (Bjp) त्याला `तुम्ही महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा प्रस्ताव द्या, मग मी हिंदुत्वाच्या नावाने बोंबा मारतो`, अशी टिप्पणी अंबादास दानवे यांनी केली होती. (Aurangabad)

सोशल मिडियावर या पोस्टची चर्चा चांगलीच झाली. त्यानंतर दानवे यांनी आता हिंदुत्वावरून शिवसेनेला लक्ष्य करणाऱ्या भाजपला दुसरा दणका दिला आहे. चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांनी नुकतीच हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेवर टीका केली होती. त्याच श्वेता महाले यांनी आपल्या फेसबुक पेजवरून एक फोटो व्हायरल केला आहे, ज्यात त्या दर्ग्यावर चढवण्यासाठीची चादर डोक्यावर घेऊन जात आहेत. यावर अंबादास दानवे यांनी आपल्या फेसबुक पेजवरून हा फोटो व्हायरल करत ` अहो खाला जरा थांबा`, असा टोला लगावला आहे.

राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्षं गेल्या दोन-अडीच वर्षापासून सुरू आहे. यात प्रामुख्याने शिवसेनेला भाजपकडून लक्ष्य केले जात आहे. यातही हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेची कोंडी करण्याची एकही संधी भाजप सोडत नाही. शिवसेनेने जनाब बाळासाहेब स्वीकारले आहे, सत्तेसाठी त्यांनी हिंदुत्व सोडलं अशी टीका सात्याने केली जाते. शिवसेनेकडून त्याला वेळोवेळी प्रत्युत्तरही दिले जाते. भाजपच्या नेत्यांपासून ते आमदार, शहर-जिल्हाध्यापर्यंत सगळेच शिवसेनेला हिंदुत्वावरून सुनावत असतात.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ईडीने अटक केली आहे. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार त्यांच्या बचावत उतरले आणि त्यांनी मलिकांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय घेतला. यावरून श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करतांना बाॅम्बस्फोटातील आरोपींशी संबंध असणाऱ्यांना ठाकरे वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप केला होता.

Shivsena Mla Ambadas Danve
दहशतवाद्यांची वकिली करणाऱ्या ओवेसींच्या एमआयएमसोबत कधीच जाणार नाही..

आता संधी मिळताच शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी देखील श्वेता महाले यांच्यावर निशाणा साधला. महाले यांच्याच फेसबुकवरील फोटोचा दाखला देत दानवे यांनी `अहो खाला जरा थांबा, इतरांस सांगे ब्रम्हग्यान आणि स्वतः जाऊदे.. आता कालच या बाई शिवसेनेला हिंदूत्त्वावर ज्ञान पाजळत होत्या. येवढे जाती - धर्माचा द्वेष निर्माण करणारा घाणेरडे राजकारण कशासाठी ? फ़क्त प्रसिद्धीसाठी, इतरांना नाव ठेवायच आता तुम्हाला काय म्हणायचं ? असा सवाल करत टोला लगावला आहे.

सैलानी यात्रेनिमित्त आमदार श्वेता महाले यांनी नुकतीच येथील दर्ग्यावर चादर चढवली. याचे छायाचित्र त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर व्हायरल केले आहेत.` दरपे तुम्हाले सैलानी बाबा खुश नसीब आए` असे म्हणत त्यांनी या दर्ग्याचे महत्व सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com