TET Exam Scam : मुलांचे प्रमाणपत्र रद्द ; अब्दुल सत्तारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

हीना सत्तार, उजमा सत्तार, हुमा फरहीन सत्तार, आमेर सत्तार अशी सत्तार यांच्या मुलांची नावं आहेत.
Abdul Sattar
Abdul Sattarsarkarnama

सिल्लोड : टीईटी घोटाळ्यात (TET Scam) माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटातील ज्येष्ठ नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या एका मुलाचं आणि तीन मुलीचं नाव समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.अब्दुल सत्तार यांच्या चार मुलांचं टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची बाब उजेडात आली आहे. हीना सत्तार, उजमा सत्तार, हुमा फरहीन सत्तार, आमेर सत्तार अशी सत्तार यांच्या मुलांची नावं आहेत. या प्रकरणी सत्तार यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले.

शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी या प्रकरणची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात विरोधकांचं षढयंत्र असण्याचा प्रश्न नाही. "आम्ही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत आहोत, कुणी दोषी असेल तर त्यांना शिक्षा व्हावी. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे, त्यातच हे आढळलं आहे, मी मुलांवर आरोप करणार नाही मात्र या प्रकरणाची चौकशी मात्र व्हायलाच हवी," असे दानवे म्हणाले.

काही दिवसांपूर्वीच 7880 उमेदवारांची यादी समोर आली. परिक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या या यादीमध्ये हीना सत्तार, उजमा सत्तार, हुमा फरहीन सत्तार, आमेर सत्तार अशी सत्तार यांच्या मुलांची नावं आहेत.

Abdul Sattar
TET Exam Scam : टीईटी गैरव्यवहारात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलांचा सहभाग ?

या प्रकरणी अब्दुल सत्तार स्पष्टीकरण दिलं. 'मला बदनाम करण्याचा डाव असल्याचं' अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय. 'आमची चूक असेल तर आमच्या मुलांवर कारवाई करावी. नसेल तर हे सर्व करणाऱ्यांना फासावर लटकवा चुकीची माहिती देऊन बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी' असंही सत्तारांनी म्हटलं आहे

शिक्षक परीक्षा घोटाळ्यात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या घोटाळ्याची व्यप्ती तब्बल 240 कोटी रुपयांची असल्याचे पोलीस तपास उघड झाले आहे. प्रत्येक परीक्षार्थ्यांकडून तीन ते चार लाख रुपये घेतले असल्याचेही तपासात समोर आले आहे.

परीक्षा परिषदेचे माजी अध्यक्ष तुकाराम सुपे आणि सुशील खोडवेकर यांच्यासह याप्रकरणी आतापर्यंत 14 जणांना अटक केली आहे. शिक्षक परीक्षा घोटाळ्या प्रकरणात आयएएस सुशील खोडवेकर याच्या अडचणीत वाढ झाली असून, त्याचा अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

महाराष्ट्र परीक्षा परिषदेकडून जी यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये सर्व अपात्र असणाऱ्या लोकांनी पात्र होण्यासाठी राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना पैसे दिले होते. मात्र सुपे यांच्याकडून अपात्र उमेदवारांना पात्र असण्याचे सर्टिफिकेट मिळाले नाहीत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com