ओवेसींच्या गाडीवर गोळीबार; वारंवार हल्ले होत असतांना सरकार कशाची वाट पाहत आहे?

ओवेसी यांच्यावर हल्ला होण्याची ही पहिली वेळ नाही, यापुर्वी दिल्लीत अशोका रोडवरील ओवेसींच्या घरात घुसून हल्लेखोरांनी तोडफोड केली होती. (Mp Imitaz Jalil)
Yogi Adityanath- Mp Imtiaz Jalil
Yogi Adityanath- Mp Imtiaz JalilSarkarnama

औरंगाबाद : एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर उत्तर प्रदेशातील मेरठ जवळ अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. (Asaduddin Owaisi) चार ते पाच राऊंड गाडीवर फायर करण्यात आले, सुदैवाने गाडीतील कुणालीही इजा झाली नाही. (Aimim) या हल्ल्यानंतर मात्र एमआयएमने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. (Mp Imtiaz Jalil)

खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीतील मोदी सरकार व उत्त प्रदेश सरकारवर आरोप करतांनाच ते कशाची वाट पाहत आहेत? असा सवाल केला आहे. ओवेसींच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराची माहिती देतांना इम्तियाज जलील म्हणाले, मेरठ जवळील गावात पदयात्रा, आणि सभा घेऊन परतत असतांना एका टोल नाक्यावर त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला.

अज्ञात हल्लेखोरांनी गाडीवर तीन ते चार राऊंड फायर केले. हल्ला केल्यानंतर शस्त्र टाकून हल्लेखोर तिथून पसार झाले. सुदैवाने ओवेसी सुखरूप आहेत, त्यांना दुसऱ्या गाडीतून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आणि ते आता दिल्लीत आपल्या निवासस्थानी परतले आहेत. ओवेसी यांच्यावर हल्ला होण्याची ही पहिली वेळ नाही, यापुर्वी दिल्लीत अशोका रोडवरील ओवेसींच्या घरात घुसून हल्लेखोरांनी तोडफोड केली होती.

विशेष म्हणजे दिल्लीत अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या आणि या घराच्या समोर पोलिस स्टेशन असतांना हा हल्ला झाला होता. मी हा मुद्दा संसदेत देखील उपस्थित केला होता. आता पुन्हा मेरठ जवळ ओवेसींच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला.

Yogi Adityanath- Mp Imtiaz Jalil
अखेर नारायण राणे दिल्ली सोडणार; मुलाला अटक झाल्यानंतर येणार कोकणात...

या हल्यात जर काही विपरित घडले असते तर याला जबाबदार कोण? असा सवाल देखील त्यांनी केला. केंद्र आणि उत्तर प्रदेश कशाची वाट पाहत आहे? हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जावी, अशी मागणी देखील इम्तियाज जलील यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com