अखेर नारायण राणे दिल्ली सोडणार; मुलाला अटक झाल्यानंतर येणार कोकणात...

Nitesh Rane | Narayan Rane : नितेश राणेंना अटक आणि कोठडी
Narayan Rane-Nitesh Rane
Narayan Rane-Nitesh RaneSarkarnama 
Published on
Updated on

दिल्ली : काल आमदार नितेश राणे यांना अटक झाल्यानंतर अखेर उद्या केंद्रीय मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते नारायण राणे (Narayan Rane) सिंधुदुर्गमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे त्यांच्या कोकण दौऱ्याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. उद्या नितेश राणेंची दोन दिवसाची पोलीस कोठडी संपत असून त्यांना कणकवली पोलिसांकडून न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामुळे नितेश यांना आता उद्या न्यायालयीन कोठडी मिळणार पुन्हा पोलिस कोठडी याबद्दल सिंधुदुर्गमध्ये चर्चा सुरु आहे.

नितेश राणे (Nitesh Rane) यांना संतोष परब हल्ल्याप्रकरणी काल २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर काल दुपारी ते पोलिसांना शरण आले. त्यानंतर नितेश राणेंचे पीए राकेश राणेंच्या मोबाईलवरून हल्ल्यातील संशयीत आरोपी सातपुते याच्याशी नितेश राणेंचे झालेले मोबाईल संभाषण व राकेश परब व नितेश राणे यांची चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली होती.

Narayan Rane-Nitesh Rane
कोकण दर्शनानंतर नितेश राणेंना घेवून पोलिस गोव्यात; ७ तासांपासून चौकशी सुरु!

तर कालच नारायण राणे यांचा दुसरा मुलगा निलेश राणे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी पत्र लिहून निलेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. सत्र न्यायालयाच्या बाहेर निलेश नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जमावबंदी आदेश असतांना देखील याठिकाणी बंदोबस्ताकरिता तैनात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी स्वत: व त्यांच्या २५ च्या आसपास समर्थकांनी अरेरावी व अर्वाच्या भाषेमध्ये पोलीसांना शिवीगाळ केली, असा आरोप नाईक यांनी केला होता. त्यानंतर नाईक यांच्या पत्राची दखल घेत पोलिसांनी निलेश राणे यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.

Narayan Rane-Nitesh Rane
मोठी घडामोड : परब हल्ल्याचा कट पुण्यात आखला; राणेंना तपासासाठी पुण्याला हलवणार

त्यामुळे या सगळ्यात नारायण राणे कुठे आहेत असा सवाल विचारला जात होता. एक मुलगा तुरुंगात आणि दुसऱ्या मुलावार गुन्हा दाखल होवूनही अद्याप राणे सिंधुदुर्गमध्ये आलेले नाहीत. याशिवाय ते कुठेही माध्यमांशी बोलताना दिसून आले नाहीत किंवा सोशल मिडीयावरुन देखील त्यांनी कुठेही याबद्दल भाष्य केलेले नाही. मात्र सध्या ते दिल्लीत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात असून अखेर उद्या ते सिंधुदुर्गमध्ये येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com