BJP Politics : सावरकरांचा अपमान करणाऱ्याचे वडील पंतप्रधान व्हावेत का?

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा थेट सवाल
Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule, Uddhav ThackeraySakarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : 'इंडिया' आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव चर्चेत येत आहे. ममता बॅनर्जी यांनी हे नाव सुचवले होते. उद्धव ठाकरे (uddhav thackeray) 'इंडिया' आघाडीचे महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारे प्रियांक खर्ग यांचे वडील मल्लिकार्जुन खर्गे पंतप्रधानपदाचे उमेदवार व्हावेत का? असा थेट सवाल उद्धव ठाकरेंना केला आहे. प्रियांक खर्गे हे कर्नाटक सरकारमध्ये मंत्री आहेत.

Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray
Congress : काँग्रेसला समोसाही परवडेना; भाजपची संपत्ती डोळे दीपवणारी...

महाविजय-2024 अभियानांतर्गत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी हिंगोली लोकसभा क्षेत्राचा दौरा केला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजातील कुणबी नोंदी असणाऱ्या कुटुबांना लाभ व्हावा यासाठी एसओपी तयार करण्याबाबत सांगितले आहे. त्यानुसार कार्यवाही होईल व त्याचा फायदा मिळेल, असे बावनकुळे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा आरक्षणावरून राज्यात सुरु असलेल्या आंदोलनाबाबत आणि मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबाबत बावनकुळेंनी भाष्य केले. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्र व सर्व पक्ष मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पाठिशी आहेत. जरांगे यांना अपेक्षित आरक्षण मिळावे. सोबतच ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होणार नाही किंवा त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी महायुती सरकारकडून घेतली जात आहे, असे बावनकुळे म्हणाले.

भाजपचे राज्यभर आंदोलन

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री केंद्राकडून मदत मिळावी यासाठी दिल्ली येथे जात आहेत. राज्यात अवकाळी व दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई केंद्राकडून व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. शिवाय उपराष्ट्रपती जगदीप धनगड यांच्याविषयी करण्यात आलेल्या व्यंगात्मक टीकेच्या विरोधात भाजप गुरुवारी राज्यभर आंदोलन करत असल्याचे देखील बावनकुळे यांनी सांगितले.

(Edited By Roshan More)

Chandrashekhar Bawankule, Uddhav Thackeray
Karad Politics : डॉ. भोसले गटाने काढले उट्टे; बहुमत असूनही काँग्रेसने 'सोसायटी' गमावली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com