पुरंदरेंचं समर्थन करणाऱ्या राज ठाकरेंनी माफी मागावी ;श्रीमंत कोकाटे आक्रमक

राज ठाकरे यांच्या सभेला प्रंचड गर्दी असते. मात्र त्याचे मतांमध्ये रुपांतर होत नाही, मनोरंजनासाठी लोक त्यांच्या सभेला जातात.
Shrimant Kokate,Raj Thackeray
Shrimant Kokate,Raj Thackeraysarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद:महाराष्ट्र नवनिंर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या सभेत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे समर्थन केले होते. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही बाबासाहेब पुरंदरे यांच्याबाबत भूमिका मांडली होती. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुरंदरे समर्थन करीत सभेत जातीयवादाचा उल्लेख केला होता. राज ठाकरेंवर आता श्रीमंत कोकाटे (Shrimant Kokate) यांनी निशाणा साधला आहे. कोकाटे आज औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलत होते.

श्रीमंत कोकाटे म्हणाले, ''राजे ठाकरे हे बाबासाहेब पुरंदरे यांच समथर्न करतात. पुरंदरे यांनी राजमाता जिजाऊ यांची बदनामी केली आहे. त्या पुरंदरेंचं समर्थन राज ठाकरे करतात. याच पुरंदरेंनी जेम्स लेनचं समर्थन केले होते. राज ठाकरे हे शिवाजी महाराजांच्या बदनामीचं समर्थन करतात, त्यांनी माफी मागावी, पण त्यांना जनता माफ करणार नाही,''

Shrimant Kokate,Raj Thackeray
'मातोश्री'वर येऊन जा, महाप्रसाद घेऊन जा ; राणा दाम्पत्याला युवासेनेचं आव्हान

श्रीमंत कोकाटे म्हणाले, ''राज ठाकरे यांच्या सभेला प्रंचड गर्दी असते. मात्र त्याचे मतांमध्ये रुपांतर होत नाही, मनोरंजनासाठी लोक त्यांच्या सभेला जातात. त्यांच्याबाबत मी राजकीय भाष्य करणार नाही. ते छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्यांचे समर्थन करतात, याला आमचा विरोध आहे. राज ठाकरे हिंदुत्वाची भूमिका घेतात, त्याच्यामते मग शिवाजी महाराज, जिजाऊ हिंदु नाहीत का?'

''हिंदुच्या महापुरुषांची बदनामी होत असताना त्याचे राज ठाकरे समर्थन का करतात, त्यांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत हे बसते का, त्यांनी प्रबोधनकारांची पुस्तके वाचावीत, त्यानंतर ते पुरंदरेच्या भक्तीतून बाहेर पडतील. हिंदुत्वाचा मुद्दा घ्यावा की नाही, याबाबत आमचं दुमत नाही. पण महापुरुषांबाबत वाईट बोलणं, जातीजातीमध्ये संघर्ष करण्याचे स्वातंत्र्य राज ठाकरेंना कोणी दिले,''असा प्रश्न कोकाटे यांनी उपस्थित केला आहे.

Shrimant Kokate,Raj Thackeray
प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये ? आज निर्णय; गांधी कुटुंबियांसोबत महत्वाची बैठक

सध्या राज्यामध्ये मशिदींवरील लाऊडस्पीकरबाबत वाद उफाळला आहे.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 एप्रिलपर्यंत मशिदींवर लावलेले भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. अपक्ष आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा (शनिवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर (Matoshri)हनुमान चालीसाचे पठण करणार आहेत. त्यासाठी ते आज (ता. २२ एप्रिल)विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईला जाणार होते. त्यांना रोखण्यासाठी शिवसेनेकडून (shivsena) नियोजन केले जात असताना अचानक राणा पती-पत्नी मुंबईत दाखल झाले आहेत. राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी शिववसैनिक, पोलिस सज्ज झाले आहे. त्यांचा शोध आता मुंबईत घेतला जात आहे. त्यांना शोधण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com