Chhagan Bhujbal News : सरकारमध्ये सहभागी होण्याच्या प्रस्तावावर ५४ आमदारांच्या सह्या, सगळेच अजितदादांसोबत; भुजबळांचा मोठा दावा

NCP News: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय झाला तेव्हा त्या प्रस्तावावर राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांच्या सह्या होत्या, छगन भुजबळ यांचा मोठा दावा
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama

Aurangabad News : "शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय झाला तेव्हा त्या प्रस्तावावर राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांच्या सह्या होत्या. म्हणजेच सगळे आमदार अजित पवारांसोबतच आहेत. सध्या जे पाच-सहा आमदार शरद पवारसाहेबांसोबत आहेत, ते देखील लवकरच आमच्याबरोबर येतील", असा दावा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला.

बीड येथील सभेला जाण्यापूर्वी भुजबळ यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संभाजी भिडे, ब्राम्हण समाजाबद्दल केलेले विधान ते राष्ट्रवादीतील बंड अशा सर्वच विषयांवर भूमिका मांडली. "राष्ट्रवादी पक्षात फूट पडलेली नाही, पक्षातील बहुतांश प्रतिनिधी कार्यकर्ते हे अजित पवार यांच्या बरोबर आहेत. अजितदादांसोबत ४५ ते ५० आमदार आहेत. आता राहिलेले आमदारही दादांसोबत येतील", असेही ते म्हणाले.

Chhagan Bhujbal
Ajit Pawar News : आम्ही बैठका घेतल्या तर बिघडले कुठे, मुख्यमंत्र्यांना अडचण नाही ; पण...

"सरकारमध्ये सहभागी होण्यापूर्वीच्या प्रस्तावार ५४ आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. याचा अर्थ सर्वजण अजित पवार यांच्यासोबत आहेत. पवार साहेबांसोबत असलेले ५ ते ६ आमदारही लवकरच परत येतील. पवार साहेब सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशी वेगळी विधान करतात.

अजित पवारांना नेते मानात असतील तर त्यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाला आशिर्वाद द्यावेत, म्हणजे विषय मिटेल. मात्र, पुन्हा दुसरे विधान करीत साहेब गुगली टाकतात. त्या गुगली आम्हाला समजत नाही, पण गुगलीवर बँटसमन प्रत्येकवेळी आऊट होतातच असे नाही", असा चिमटाही भुजबळांनी काढला.

"अजितदादा, साहेब व जयंत पाटील हे एका बंगल्यात भेटले. मात्र, ही भेट उघडपणे करता आली असती. आम्ही शरद पवार यांना उघड भेटलो. अजितदादांच्या उपमुख्यमंत्रिपदाला आशीर्वाद द्या, असे साकडे घातले. चार वेळा मी येवला मतदारसंघात निवडून आलो. तरी शरद पवार म्हणाले, येवल्याचा माझा अंदाज चुकला. मग अंदाज तर गोंदिया ते बारामतीपर्यंतचा चुकला, असं म्हणावं लागेल", असेही भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal
Ajit Pawar In Baramati : बारामती लोकसभेतील दोन प्रकल्पांबाबत अजितदादांचे मोठे विधान; म्हणाले, "तिजोरी हातात..."

"तीस वर्षे बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम केले. नंतर पंचवीस वर्षे शरद पवार यांच्याबरोबर काम केले. त्यांच्याकडून मला काही तरी शिकायला मिळालेले आहे. म्हणून बाळासाहेब ठाकरे यांना मी देव मानतो. तसेच, शरद पवार यांनाही देव मानतो.

हे दोघेही माझ्यासाठी पांडुरंग-विठ्ठलच असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. संभाजी भिडे कोण आहेत? ते मनोहर कुळकर्णी असतील तर त्यांनी संभाजी भिडे हे नाव का धारण केले? हे नाव धारण करून ते महामानवांची बदनामी का करीत आहेत? मी सरकारचा छोटा भाग आहे. भिडेंवर कारवाई व्हायला पाहिजे, असे स्पष्टीकरण भुजबळांनी यावेळी दिले.

Edited by : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com