Sillod Assembly Election : ‘मविआ’चे उमेदवार सुरेश बनकर यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांना मारहाण

Maharashtra Assembly Election Voting Mahavikas Aghadi Suresh Bankar Abdul Sattar : सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांच्या लढत होत आहे.
Abdul Sattar, Suresh Bankar
Abdul Sattar, Suresh BankarSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. बनकर हे भोकरदन रोडवरील नॅशनल मराठी स्कूलच्या मतदान केंद्रावर भेट देण्यासाठी गेले असता त्यांना मारहाण करण्यात आली.

भाजपचे पदाधिकारी कमलेश कटारिया व इतर काही जण यावेळी बनकर यांच्यासोबत होते. मतदान केंद्रात शिरताच तिथे उपस्थित काही कार्यकर्त्यांनी सुरेश बनकर आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचे समजते. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या कमलेश कटारिया व इतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही धक्काबुक्की करत बाहेर जाण्यास भाग पाडल्याचा दावा केला जात आहे.

Abdul Sattar, Suresh Bankar
Assembly Election VIDEO : धक्कादायक : महिला मतदारांवर पोलिसांनीच रोखले पिस्तूल; सात जणांचे निलंबन, आयोगाने का केली कारवाई?

या गोंधळामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सुरेश बनकर व कमलेश कटारिया यांना मतदान केंद्रावरून बाजूला नेत गाडीत बसवून रवाना केले. दरम्यान, सुरेश बनकर यांना धक्काबुक्की झाल्याची माहिती कळताच जमालशहा कॉलनीच्या नॅशनल मराठी स्कूल जवळ मोठी गर्दी जमा झाली होती. पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी मतदान केंद्रात जमलेल्या जमावाला हुसकावून लावले. हा प्रकार सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घडला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत गर्दी पांगवली आणि काही मिनिटांसाठी थांबलेली मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू केली. सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांच्या लढत होत आहे.

Abdul Sattar, Suresh Bankar
Bjp News : सायनमधील मतदान केंद्रावर राडा; पोलिसांसोबत भाजपच्या 'या' बड्या नेत्यांची बाचाबाची

गेल्या पंधरा दिवसात प्रचारादरम्यान या दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत टीका केली होती. अब्दुल सत्तार हे सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेले आहेत. यावेळी मतदारसंघांमध्ये सत्तार यांच्या विरोधात वातावरण असल्याचे चित्र निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये कुरबुरी सुरू होत्या.

राज्यात महायुती असली तरी सिल्लोड सोयगाव मतदार संघामध्ये भाजपने सत्ताविरोधात भूमिका घेत बनकर यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. आज सिल्लोड मध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद होण्याची शक्यता आहे. सिल्लोड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदान केंद्रावरही सुरेश बनकर यांना धक्काबुक्की करून बसवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com