Imtiaz Jalil : तर भाजपने यापुढे शिवाजी महाराजांचे फोटो, पुतळे आपल्या कार्यक्रमात ठेवू नयेत..

आता गरज निर्माण झाली आहे की, सगळ्या राजकीय पक्षांनी आपले मतभेद विसरून राज्यपालांना घालवण्यासाठी एकत्र आले पाहिजे. एमआयएम देखील त्यासाठी सोबत यायला तयार आहे. (Imtiaz Jalil)
Aimim Mp Imtiaz jalil News Aurangabad
Aimim Mp Imtiaz jalil News AurangabadSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे वारंवार महापुरुषांचा अवमान करत आहेत. विशेष म्हणजे ज्या विद्यापीठातून आपण विद्यार्थ्यांना नवे आदर्श शिकवतो, त्याच शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रातून संवैधानिक पदावरील व्यक्तीने `शिवाजी महाराज पुराने जमाने के है`, असे म्हणणे दुर्दैवी आहे. Aimim त्यामुळे त्यांचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. राज्यपाल काहीही बरळतात आणि Bjp भाजपचे नेते त्याचे समर्थन करतात याचाच अर्थ त्यांची देखील हीच भूमिका आहे का? असा प्रश्न उपस्थितीत होतो.

Aimim Mp Imtiaz jalil News Aurangabad
राज्यपाल कोश्यारींच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीचं 'धोतर फेडो' आंदोलन

महापुरुष हे कायमच आदर्श असतात, काळानुसार त्यांचे महत्व कमी होत नसते. शिवाजी महाराज पुराने जमाने के आदर्श थे, असं जर (Bjp) भाजपलाही वाटत असेल तर यापुढे त्यांनी आपल्या कुठल्याही कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो अथवा पुतळा ठेवू नये, त्यांना आदर्श वाटतात त्यांचे ठेवावेत, असा टोला एमआयएमचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी लगावला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत केलेले विधान बरोबर की चुकीचे यावर वाद घालण्यापेक्षा जो इतिहास आहे तो स्वीकारला पाहिजे. सावरकरांचे ते पत्र, त्यांनी मागितलेली माफी, तेव्हाचा काळ या सगळ्या गोष्टींचा विचार टीका करणाऱ्या आणि समर्थनात रस्त्यावर उतरणाऱ्यांनी केला पाहिजे. महापुरूषांवरून जेव्हा असे वाद निर्माण केले जातात, तेव्हा इतिहास हा कधी बदलत नसतो हे देखील लक्षात ठेवले पाहिजे, असा सल्ला देखील त्यांनी दिला.

राज्यात आणि देशात सध्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मागितलेली माफी अन् राज्यपालांनी शिवाजी महाराज पुराने जमाने के आदर्श थे या केलेले वादग्रस्त विधान चांगलेच गाजते आहे. राज्यातील राजकीय वातावरण या दोन घटनांमुळे तापलेले आहे. या वादावर एमआयएमने `सरकारनामा`शी बोलतांना आपली भूमिका स्पष्ट केली.

खासदार इम्तियाज जलील म्हणाले, देशात महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगारांचे प्रश्न महत्वाचे असतांना त्यावरील लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न म्हणून मी या विधानाकडे पाहतो. राज्यपाल पदावर बसलेल्या व्यक्तीने जिथे सत्ताधारी कमी पडतात तिथे हस्तक्षेप करून जनतेच्या हिताचे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे प्रश्न सोडवणे अपेक्षित असते. परंतु सध्या जे राज्यपाल आहेत ते सातत्याने महापुरुषांच्या बाबतीत चुकीची आणि समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य करत आहेत.

Aimim Mp Imtiaz jalil News Aurangabad
Sanjay Raut : राहुल गांधींचा फोन, पण जुन्या सहकाऱ्यांनी विचारपूसही केली नाही, राऊतांचा मनसे,भाजपला टोमणा

वारंवार अशी विधाने त्यांच्याकडून होत असल्याने ज्या पक्षाच्या विचारसरणीचे ते आहेत, तो भाजप पक्ष त्यांना पाठीशी घालतांना दिसतो आहे. त्यामुळे आता गरज निर्माण झाली आहे की, सगळ्या राजकीय पक्षांनी आपले मतभेद विसरून राज्यपालांना घालवण्यासाठी एकत्र आले पाहिजे. अगदी माझ्या एमआयएम हा पक्ष देखील त्यासाठी सोबत यायला तयार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे देखील आदर्श आहे. त्यांना काळाच्या बंधनात अडकवता येत नाही, ते कायमच आदर्श असतात.

त्यामुळे भाजपला जर ते आदर्श वाटत नसतील तर त्यांनी यापुढे आपल्या कुठल्याच कार्यक्रम, सभा, मेळाव्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, पुतळा ठेवू नये. त्यांना जे आदर्श वाटतात त्या मोदी किंवा अन्य कुणाचे फोटो, पुतळे त्यांनी आपल्या कार्यक्रमातून ठेवावेत.

भाजपचा एक प्रवक्ता शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे माफीचे पत्र पाठवले होते, असा जाहीर कार्यक्रमात उल्लेख करतो यापेक्षा दुसरी दुर्दैवी गोष्ट असू शकत नाही. याच एकच अर्थ निघू शकतो, तो म्हणजे असे वाद हे ठरवून निर्माण केले जातात. राज्यपालांनी आता सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यामुळे सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन त्यांना महाराष्ट्रातून घालवावे, असेही इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com