Maratha Reservation :
Maratha Reservation :Sarkarnama

Maratha Reservation : ...तर मराठ्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरेन; संभाजी पाटील-निलंगेकरांनी व्यक्त केली भावना

Sambhaji Patil-Nilangekar : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती.
Published on

Latur Politics : ``मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ज्या वेळी आरक्षण मिळविण्यासाठी शांततेत आंदोलन करावयाचे आहे, त्या वेळी आपला आदेश येताच मी माझ्या असलेल्या सर्व पदाचा मुलाहिजा न बाळगता आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरण्यास तयार आहे,`` असे भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

जालना जिल्ह्यात अंतरावली सराटी येथे शांततेत उपोषण आंदोलन करणारे मनोज पाटील आणि त्यांच्या सहकार्यावर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमारानंतर त्याचे पडसाद राज्यभर तीव्रतेने उमटले. काल मराठा सेवा संघ आणि सकल मराठा समाजाच्या वतीने माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना घेराव घालण्यात आला होता. झालेल्या घटनेबाबत आणि मराठा समाजाचे एक सदस्य आणि आमदार म्हणून आपली भूमिका स्पष्ट करावी, यासाठी आंबुलगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना परिसरात हा घेराव घालण्यात आला होता.

Maratha Reservation :
Raj Thackeray On Fadanvis : तुम्ही विरोधी पक्षात असता तर काय केलं असतं ? राज ठाकरेंनी फडणवीसांना सुनावले..

या वेळी भूमिका स्पष्ट करताना आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, ``कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. हे सरकार दरबारी निश्चितपणे मांडू. गेल्या काही वर्षात आपण जे लाखोंचे मोर्चे अगदी शांततेत काढले, त्याची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली, हे प्रत्येक तरुणाने हे लक्षात ठेवले पाहिजे. राजकीय बहकाव्यात कोणी येऊ नये, आणि शांतेतील मोर्चांना कोणतेही गालबोट लागू नये, यासाठी तरुणांनी प्रयत्न केला पाहिजे.''

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. त्यामध्येही आमदार संभाजी पाटील यांनी आग्रहपूर्वक सदस्यपद मिळविले होते. तेव्हापासून आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि त्यांच्या मातोश्री माजी खासदार रुपाताई पाटील कुटुंबियांसह मराठा मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. आरक्षण मिळावेच अशी स्पष्ट भूमिका त्यांनी प्रत्येक वेळी घेतली आहे. घेरावातील कार्यकर्त्यांनाही त्यांनी हेच स्पष्टपणे सांगितले.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com