काही लोकांनी देवाच्या जमिनी खाल्ल्या; पण दहशतीचा अंत होतच असतो

ज्यांनी सर्वसामान्यांची दुकाने, घरे पाडली, त्यांना या निवडणुकीत आपल्याला पाडायचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले. (Ncp Yoth Congress)
Ncp Youth Mehboob Shaikh

Ncp Youth Mehboob Shaikh

Sarkarnama

Published on
Updated on

बीड : देवस्थानांची महती लक्षात घेत जुने लोक हिंदू देवस्थाने व दर्ग्याला जमिनी दान देत होते. मात्र, आष्टीच्या काही लोकांनी देवाच्याच जमिनी खाण्याचे काम केले. (Beed) दहशतीचा कधीतरी अंत होतच असतो, (Marathwada) हिटलरची दहशतही संपून त्याला आत्महत्या करावी लागली, अशी टीका राष्ट्रवादी (Rashtravadi Congress) युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी भाजप आमदार सुरेश धस यांचे नाव न घेता केली.

आष्टी (जि. बीड) येथे नगर पंचायत निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी शेख यांचे भाषण झाले. यावेळी त्यांनी देवस्थान जमिनीचा मुद्दा उपस्थित करुन त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. जिल्ह्यात विविध देवस्थानच्या हजारो एकर जमिनी बनावट आदेशाने हडपल्याचे प्रकार घडले आहेत.

आष्टी तालुक्यातील रुईनालकोल आणि चिंचपूर येथील दर्गाच्या जमिनींच्या हस्तांतरण प्रकरणी गुन्हे नोंद झाले असून या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापनाही करण्यात आली आहे. दरम्यान, देवस्थान जमिन प्रकरणी भाजप आमदारांवर आरोप करण्यात आले असून ईडी (सक्तवसूली संचालनालय) कडे याची तक्रारही करण्यात आली आहे.

आष्टीत देवस्थान जमिनींचे प्रकरण गाजत असताना महेबुब शेख यांनीही नेमक्या याच कळीच्या मुद्द्याला हात घातला. ज्यांनी सर्वसामान्यांची दुकाने, घरे पाडली, त्यांना या निवडणुकीत आपल्याला पाडायचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

पळता भुई थोडी होईल..

आमदार बाळासाहेब आजबे म्हणाले, कोव्हिडसारख्या भयानक साथरोगाच्या काळात रेमडिसिव्हीर इंजेक्शनची ३०-३५ हजारांपर्यंत अव्वाच्या सव्वा भावाने विक्री करण्याचा धंदा कुणी केला. आष्टी शहर भयमुक्त करण्यासाठी नगरपंचायतीची सत्ता ताब्यात द्या, असे आवाहनही त्यांनी केले. सृष्टीचे संचालन देवामार्फत होत असल्याची धारणा आहे. देवाची जमीन कोण खातं याची माहिती देवाला नसेल का?

<div class="paragraphs"><p>Ncp Youth Mehboob Shaikh</p></div>
सुहास दाशरथेंना मुंबईचा ‘गॉडफादर’ मिळालाच नाही !

हे प्रकरण बाहेर आल्यानंतर माझ्यावर आरोप करण्यात आले. मात्र, माझे नाव देवस्थानशी संबंधित जमिनीवर निघाल्यास मी आमदारकीचा राजीनामा देईन. गेल्या पाच वर्षांत विकास केल्याचा दावा करणाऱ्यांना बाहेरुन मतदान का आणावे लागते, असा सवाल करत विकासकामे दर्जाहीनपणे करण्यात आली.

यातील अनियमितता बाहेर काढली तर विरोधकांना पळता भुई थोडी होईल. निकृष्ट कामांमुळे सत्ता जाण्चाची भीती विरोधकांना असल्यानेच मतदारयादीत शेजारील १२ गावांतील बोगस मतदारांचा समावेश करण्यात आल्याचा, टोला आमदार आजबे यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com